HADAPSAR:एस. एम. जोशी कॉलेजमध्ये निर्भय कन्या अभियान उपक्रम संपन्न

HADAPSAR:एस. एम. जोशी कॉलेजमध्ये निर्भय कन्या अभियान उपक्रम संपन्न 

हडपसर, ४ मार्च २०२५ (प्रतिनिधी) - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ, महिला सक्षमीकरण समिती व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान उपक्रम रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.संतोष तांबे व डॉ.संदीप वाकडे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे साहेब यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.संतोष तांबे म्हणाले की महाराष्ट्र ही संतांची आणि क्रांतिकारकांची कर्मभूमी आहे. महाराष्ट्र ही शूर वीरांची भूमी असून त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे. आजच्या तरुणांनी आपला इतिहास वाचन लेखनाच्या माध्यमातू आत्मसात केला पाहिजे. आपल्या इतिहासामध्ये झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, अहिल्याबाई होळकर इतर कर्तुत्वान स्त्रिया होऊन गेल्या. त्यांचे कर्तुत्व आत्मसात करून आजच्या विद्यार्थिनींनी वाटचाल करावी. असे मत प्रा. संतोष तांबे यांनी व्यक्त केले. डॉ.संदीप वाकडे यांनी मराठी गीतांच्या माध्यमातूम साहित्य आणि समाज यांचा संबंध स्पष्ट केला. तसेच त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने गीतगायन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मराठी विभागप्रमुख प्रा.राधाकिसन मुठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळाचे चेअरमन डॉ.अतुल चौरे यांनी तर पाहुण्यांचा परिचय महिला सक्षमीकरण समिती चेअरमन डॉ.ज्योती किरवे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार डॉ.शितल कोरडे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुशांत मोकळ यांनी केले. कार्यक्रमासाठी क्रीडा विभागप्रमुख प्रा.दत्ता वासावे, डॉ.संघर्ष गायकवाड, प्रा. महेश देवकर, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.