पिंपरी (लोकमराठी न्यूज) : हवालदार पदावर कार्यरत असलेले योगेश ढवळे (वय ४०) यांच्या दुचाकीला हायवा वाहनाने धडक दिल्याने त्यांचे अपघाती निधन झाले. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास चाकण येथे घडली. ते चाकन वाहतूक विभागात कर्तव्यावर होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ढवळे (Yogesh Dhawale) यांना आज (दि. ०८ ऑगस्ट २०२३) चाकण वाहतूक विभागाच्या अंतर्गत माणीक चौक येथे सकाळी आठ ते रात्रौ नऊपर्यंत कर्तव्यास नेमण्यात आले होते. ते सकाळी दहाच्या सुमारास पंचप्रण शपथ घेण्याकरीता ते त्यांचे मोटार सायकल (क्रमांक एम.एच.१४ सी.एफ. ६४८०) वरुन चाकण वाहतूक विभागाकडे येत असताना एच.पी. पेट्रोल पंपासमोर हायवा (क्र. एम.एच. १४ जे.एल. ९९३६) वरील चालकाने त्यांचे मोटार सायकलला धडक दिल्याने त्यामध्ये पो. हवालदार ढवळे हे गंभीर जखमी होऊन मयत झाले.