पत्नीसोबत तीच्या मित्राला घरात पकडले | भोसकून दहाव्या मजल्यावरून दिले ढकलून

पत्नीसोबत तीच्या मित्राला घरात पकडले | भोसकून दहाव्या मजल्यावरून दिले ढकलून

पिंपरी : पत्नीसोबत घरात सापडलेल्या तिच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकून गॅलरीच्या दहाव्या मजल्यावरून ढकलून दिले. यात पत्नीच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. २६ ऑक्टोबर २०२२) रात्री साडे दहाच्या सुमारास पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील मोशीत घडली.

या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसात (Bhosari MIDC Police) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पंकज शिंदे (वय ३५) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर, निलेश अशोक जोर्वेकर (वय ३७) असे खून करण्यात आलेल्या पत्नीच्या मित्राचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज शिंदे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. दोन दिवसांपूर्वी मी गावाला जात आहे. असं पत्नीला सांगून तो घराबाहेर पडला. याच दरम्यान, पंकजच्या पत्नीला मयत निलेश अशोक जोर्वेकर भेटायला आला. पंकजची पत्नी आणि मयत निलेश हे दोघे अत्यंत जवळचे मित्र होते. पंकज हा पत्नीवर पाळत ठेवून होता. तो एक दिवस अगोदरच गावावरून परत आला होता.

तेव्हाच, निलेश आणि पत्नी हे दोघे त्यांच्या घरात गेले, त्या पाठोपाठ काही मिनिटांनी तिथं पंकज देखील पोहचला. पत्नी समोरच मित्र निलेश आणि पती पंकज यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. याच रागातून पंकजने धारदार शस्त्राने निलेशला भोसकले. या हल्ल्यात निलेश गंभीर जखमी झाला. एवढचं नाही तर पंकजने निलेशला राहत्या घराच्या दहा मजल्याच्या गॅलरीतून थेट खाली ढकलून दिले. यात, निलेशचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पंकजला अटक केली आहे.