- काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे यांच्या प्रयत्नामुळे सासरच्यांवर गुन्हा दाखल
पिंपरी : आंतरजातीय विवाह केलेल्या एका 34 वर्षीय विवाहितेचा सतत शारिरीक व मानसिक छळ करत तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना ऑक्टोबर 2016 ते 7 डिसेंबर 2022 दरम्यान मोशीत घडली. या प्रकरणी पिडीतेचा पती, सासू व सासरे यांच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 307, 498 (अ) यांच्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पिडीतेला धीर देत, तीला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शहराध्यक्षा सायली नढे यांनी प्रयत्न केले.
फय्याज सय्यद व जहांगिर सय्यद अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील पिडीतेला चार वर्षांची मुलगी आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2015-2016 च्या दरम्यान पिडीत महिला पिंपरीतील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तीची ओळख आरोपी फय्याज याच्यासोबत झाली. ते एकमेकांशी बोलत असत. पुढे त्यांचे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी 16 ऑगस्ट 2016 मध्ये पुणे न्यायालयात आंतरजातीय प्रेमविवाह केला. विवाहानंतर ती त्याच्यासोबत मोशी येथे त्याच्या घरी राहण्यास आली. परंतु त्याच्या आई वडिलांना त्यांचा विवाह मान्य नसल्याने ते त्यांच्याशी बोलत नसत.
लग्नानंतर एक ते दोन महिने तीच्या पतीने तीला निट नांदविले. त्यानंतर तो रोज दारु पिवुन घरी येवुन काहीतरी कारण काढुन तीच्याशी वाद घालुन तीला मारहाण करत असे. त्यावेळी तीचे सासु-सासरे पतीची बाजु घेत असत. त्याला ” दुस-या जातीची कशाला करून आणली, सोडून दे, आपण आपल्या जातीची मुलगी करु ” असे म्हणत असत. लग्नानंतर काही दिवसांनी ती गर्भवती असताना व 4 मार्च 2018 रोजी त्यांना मुलगी झाल्यानंतरही तीचा पती तीला दारु पिवुन सतत वाईट वाईट शिवीगाळ व मारहाण करत असे. तसेच तो अधुनमधुन 8-10 दिवसांसाठी घरातुन निघुन जावु लागला. त्यावेळी तीने त्याचा शोध घेतला असता, तो सासु सास-यांचे घरी जात असे.
त्याची सततची वाईट वाईट शिवीगाळ व मारहाण ती मुलीकडे पाहुन सहन करत होती. याबाबत तीने अहमदनगर येथे राहणाऱ्या आपल्या आईला सांगितले असता, तीच्या आईने तीच्या पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीच्या आईलाही त्याने शिवीगाळ केली.
गेल्या एक महिन्यापुर्वी सायंकाळी 7.30 वाजेचे सुमारास तीचा पती असाच दारु पिवुन घरी आला व तीला शिवीगाळ करुन मारहाण करु लागला. त्यावेळी तीने त्याला अडविले असता, तो तीला ढकलत बेडरुममध्ये घेवुन गेला. त्यानंतर त्याने दोरीवर लटकलेली एक ओढणी घेवून पंख्याला बांधली. पंख्याखाली खुर्ची ठेवून ओढणी तीच्या गळ्यात बांधली व तीला जबरजस्तीने खुर्चीवर चढवले. त्यावेळी तीची मुलगी आल्याने ती ओढणी सोडवुन बाहेर पळत गेली. त्यावेळी तो तीच्या मागे पळत आला व शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. त्यानंतर तो रागाच्या भरात घरातुन निघुन गेला. 10-12 दिवसांनी परत घरी आला.
त्यानंतर 7 डिसेंबर 2022 रोजी पहाटे 5.30 वाजेचे सुमारास तो दारु पिवुन घरी आला. पुन्हा विनाकारण शिवीगाळ करुन मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देवुन निघुन गेला. त्यामुळे त्याचा शोध घेत ती सासु-सास-यांच्या घरी गेली असता, तेथेही त्यांनी तीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली.
शेवटी त्याच्या मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून पिडीत महिलेने काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्त्या व काँग्रेस शहराध्यक्षा सायली किरण नढे यांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांना सांगितली. याबाबत नढे यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेऊन पिडीतेला न्याय देण्याची मागणी केली. त्यानंतर तातडीने सुत्रे फिरली व भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा