पिंपरी चिंचवड : हृदयाला जोडणारी मुख्य धमनी फाटलेल्या २१ वर्षीय तरूणावर सिनेर्जी हार्ट इन्स्टिट्यूट हॉस्पिटलमध्ये जटील अशी बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या करण्यात आली. सुमारे सात ते आठ चालणाऱ्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी आपली सर्व कौशल्ये पणाला लावून तरूणाला जीवनदान दिले.
या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत ह्रदय रोग तज्ञ डॉ. गौतम जुगल (Dr Gautam Jugal) व डॉ. सचिन हुंडेकरी (Dr Sachin Hundekari) , ह्रदय शल्य चिकित्सक डॉ. स्मृती हिंदारीया (Dr Smurti Hindaria) , भुलतज्ञ डॉ. सुहास पाटील (Dr Suhas Patil) यांचा सहभाग होता.
अक्षय माने असे या तरूणाचे नाव असून छातीत व पाठीत तिव्र वेदना आल्यामुळे तो सिनेर्जी हॉस्पिटल येथे आला असता, ह्रदय रोग तज्ञ डॉ. गौतम जुगल यांनी पुर्ण तपासणीअंती, त्याला एओर्टिक एन्युरिझम (महाधमनी विकार) व टाईप-ए-एओर्टीक डिसेक्शन म्हणजेच महाधमनी विच्छेदन असल्याचे निदान केले. हा एका घातक आजार असून त्वरित शस्त्रक्रिया नाही केली, तर रूग्ण दगावण्याची भिती असते. त्यामुळे रूग्णाची गंभीर स्थिती बघता तातडीने बेंटाल सर्जरी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
याबद्दल अधिक माहिती देताना ह्रदय रोग तज्ञ डॉ. सचिन हुंडेकरी यांनी असे सांगितले की, अशा केसमध्ये महाधमनीचे स्तर ( शरिराची मुख्य धमनी एओर्टा) एकमेकांपासून वेगळे होतात. आणि धमनी आतून फाटते. या मुख्य धमनीचा व्यास 2.5 ते 3 सेंटीमीटर असतो. मात्र, या केसमध्ये तो वाढून 5.1 सेमी झाला होता. त्यात रूग्णाची आर्थिक परिस्थिती सक्षम नव्हती, तरी हॉस्पिटलने माफक खर्चात ही शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. आणि हे एक अवघड व जटील ऑपरेशन पार पाडले.
याबाबत ह्रदय शल्य चिकित्सक डॉ. स्मृती हिंदारीया म्हणाल्या की, यात क्षतिग्रस्त हृदयाची झडप व महाधमनीला बदलून एक ग्राफ्ट व कृत्रिम झडप बसविण्यात येते आणि कोरोनरी धमनी जे हृदयाला रक्तपुरवठा करतात, त्यांना ग्राफ्टला जोडले जाते.