मोठी बातमी

धक्कादायक : हप्ता दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलांचा दुकानदारावर कोयत्याने वार | पिंपरी चिंचवडमधील खळबळजनक घटना
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

धक्कादायक : हप्ता दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलांचा दुकानदारावर कोयत्याने वार | पिंपरी चिंचवडमधील खळबळजनक घटना

पिंपरी-चिंचवड शहरात भरदिवसा कापड दुकानात जाऊन हप्ता द्या अन्यथा व्यवसाय करू देणार नाही, अशी धमकी देत कोयत्याने दुकानदारावर वार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत दुकानात काम करणारे दोन तरुण जखमी झालेत. कासीम अस्लम शेख (वय २६) या तरुणाने पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. व्हिडीओ पहा : https://youtu.be/n8CSVBzAyRQ https://twitter.com/lokmarathi/status/1437846367406231554?s=19 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील डीलक्स चौक येथे मिस्टर मॅड या नावाचे कापड दुकान आहे. तिथे तीन अल्पवयीन मुलं कोयता घेऊन दुकानात शिरले, त्यांनी व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्या, असं म्हणून हप्ता मागितला आणि धमकावले. मात्र, दुकानात मालक नसल्याने कामगार गोंधळून गेले होते. काही...
मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचा पदाधिकारी सहकाऱ्यांसह २५ लाखाच्या खंडणीप्रकरणी अटक
पुणे, मोठी बातमी

मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचा पदाधिकारी सहकाऱ्यांसह २५ लाखाच्या खंडणीप्रकरणी अटक

पिंपरी : एका दुकानदाराकडे २५ लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचा पदाधिकारी व त्याच्या सहकाऱ्यांना विरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन एकुण सात जणांना वाकड पोलीसांनी अटक केली आहे. हेमंत निवगुणे, कपिल राक्षे, आदित्य जेधे, तानाजी मस्तुद, किरण घोलप, सतीश केदारी, ज्योस्त्ना पाटील अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सुरजाराम रुपाराम चौधरी (वय ३७, रा. राव कॉलनी, प्लॉट नं. , रो. हाऊस नं. ०५, भंडारी हॉस्पिटल जवळ, तळेगाव दाभाडे, मुळगावराजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे रामनगर राहटणी येथे बालाजी ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. शुक्रवारी (ता.१०) सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपी सतीश केदारी आणि त्याचे अन्य सहकारी चौधरी यांच्या दुकानात आले. आम्ही मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण ...
साकीनाका घटना निंदनीय! फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

साकीनाका घटना निंदनीय! फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई, दि ११ : साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले....
Video : लालबाग राजाच्या दरबारात पोलीस निरीक्षक संजय निकम यांची पत्रकारांना धक्काबुक्की | एनयुजेएमची कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

Video : लालबाग राजाच्या दरबारात पोलीस निरीक्षक संजय निकम यांची पत्रकारांना धक्काबुक्की | एनयुजेएमची कारवाईची मागणी

मुंबई : प्रसिद्ध लालबागचा राजा दरबारात पोलिसांनी पत्रकारांना आरेरावी करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक संजय निकम यांचा पत्रकारांना अरेरावी आणि धक्काबुक्की करत असल्याचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय. आज सकाळी पोलिसांच्या कडक निर्बंधांमुळे आधी श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब झाला. त्यानंतर लालबागचा राजा मंडळात एकानंतर एक वाद होताना दिसत आहेत. 'हात काय, पाय पण लावेन… पोलीस निरीक्षक संजय निकम स्वतः तर मास्क घातला नव्हता. आणि एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराने पास दाखवूनही त्याला आत सोडण्यात आले नाही. उलट त्याला धक्काबुक्की केली. तसेच, पत्रकारांनी हात लावू नका असे म्हटल्यावर, ''हात काय, पाय पण लावेन'', अशी गुंडगिरीची भाषा वापरली. त्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशिवाय इतर पत्रकारांनाही बॅरिकेडच्या बाहेर काढण्यात आले. यावेळीही निकम यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचे कॅमेऱ्यात ...
उल्लेखनीय : भरोसा सेलमुळे कर्जत उपविभागात ७२ दांपत्यांचा संसार सुरळीत
मोठी बातमी, महाराष्ट्र

उल्लेखनीय : भरोसा सेलमुळे कर्जत उपविभागात ७२ दांपत्यांचा संसार सुरळीत

अहमदनगर : कर्जत पोलीस उपविभागातील भरोसा सेल कडून अनेक दांपत्य आणि पीडित पुरुष व महिलांचे समुपदेशनाद्वारे संसार सुरळीत करण्याच्या प्रयत्नांना यश आले असून या भरोसा सेल मुळे अनेकांचे प्रपंच मार्गाला लागले आहे. यात कर्जत उपविभागात एकूण ७२ प्रकरणात समझोता होऊन त्यांच्या आयुष्याच्या निसटलेल्या रेशीमगाठी पुन्हा घट्ट झाल्याने कुटूंबासह नातेवाईकांतही समाधानाचे वातावरण आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून पोलीस उपविभागासाठी भरोसा सेलसह या सेलचे अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी ग्रामीण भागाच्या अडचणी पाहता कर्जत जामखेड पोलीस ठाण्यात महिलांच्या सुरक्षेसाठी खेडोपाडी तात्काळ पोहचण्यासाठी चार दुचाकी दोन चार चाकी(योद्धा वाहने)कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली.यामुळे महिलांच्या तक्रारीकामी याद्वारे थेट मदत मिळते आहे. गुन्हेगारी ...
महाराष्ट्राचे राजकारण तिस-या लाटेवर स्वार…
मोठी बातमी, विशेष लेख

महाराष्ट्राचे राजकारण तिस-या लाटेवर स्वार…

विजय चोरमारे कोविडच्या तिस-या लाटेवर स्वार होऊन महाराष्ट्राचे राजकारण रंगात आले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. हंड्या फुटू लागल्या आहेत. रंगपंचमीवर बंदी असल्यामुळे चिखलफेक सुरू आहे. आमच्यावर बंधने आणि तुम्ही मात्र मोकाट असे आरोप केले जात आहेत. या गोंधळात सामान्य माणूस मात्र संभ्रमात सापडल्यासारखा झाला आहे. तिसरी लाट येणार म्हणतात ते खरे की, लाट वगैरे थोतांड आहे म्हणतात ते खरे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. काय आहे तिस-या लाटेची वस्तुस्थिती ? जागतिक आरोग्य संघटनेसह आरोग्य क्षेत्रातील इतरही आंतरराष्ट्रीय संघटनांकडून वारंवार महामारीच्या लाटांचा उल्लेख केला जातो. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट वगैरे. एका लाटेचा उल्लेख केला जातो तेव्हा त्यामध्ये संबंधित आजाराचे रुग्ण, त्यांची वाढत वाढत एका विशिष्ट उंचीपर्यंत जाणारी आणि पुन्हा कमी कमी होत येणारी संख्या या ...
गुन्हे दाखल होऊनही पोलिस व आमदारांच्या आशीर्वादाने चालतेय बोगस पुरंदर विद्यापीठ?
पुणे, मोठी बातमी

गुन्हे दाखल होऊनही पोलिस व आमदारांच्या आशीर्वादाने चालतेय बोगस पुरंदर विद्यापीठ?

मानवता हितायचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी यांनी उघड केला घोटाळा लोकमराठी न्यूज नेटवर्क पुणे : राज्याची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून सरकारी अधिकाऱ्यांची निष्क्रियता याला कारणीभूत आहे, तसेच राज्यातील मंत्रीच बोगस विद्यापीठाचे विद्यार्थी असतील तर जनतेने न्याय कोणाकडे मागावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असा संताप मानवता हितायचे अध्यक्ष धनराज चौधरी यांनी व्यक्त करत पुणे पोलीस अधीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. याबाबत धनराज चौधरी यांनी सांगितले की, “पुरंदर विद्यापीठातून” हजारो विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पदव्या विकत घेतल्या आणि या पदव्यांचा वापर करून खासगी व सरकारी नोकरी देखील मिळवली. काहींनी या पदवीचा वापर करून पालिकेत प्रमोशन देखील घेतले, मात्र त्यात होरपळ झाली ती सामान्य विद्यार्थ्याची. आज सामान्य विद्यार्थी कॉलेजच्या फि भरून, आठ-आठ तास शिकवणी करून, र...
माझ्यावर गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे – केंद्रीय मंत्री नारायण राणे
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

माझ्यावर गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई : माझ्यावर सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून बेकायदेशीर पद्धतीने गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे. राज्यसरकारने सुडाचं राजकारण करू नये. असे वक्तव्ये केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. भाजपचे मंत्री नारायण राणे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर राणे यांनी याबाबत त्यांच्या फेसबुक पेजवरून आपले म्हणणे मांडले आहे. दरम्यान, मंत्री राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक चिपळूणला रवाना झाले असून कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. ...
PCMC : स्थायी समिती बरखास्त करून सर्वच आजी-माजी स्थायी समिती अध्यक्षांच्या बेहिशोबी मालमतेची चौकशी करा
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

PCMC : स्थायी समिती बरखास्त करून सर्वच आजी-माजी स्थायी समिती अध्यक्षांच्या बेहिशोबी मालमतेची चौकशी करा

https://youtu.be/4Xx62jrPS-w अपना वतन संघटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बरखास्त करावी तसेच आजी माजी स्थायी समिती अध्यक्षांच्या बेहिशोबी मालमतेची चौकशी करावी. तसेच राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भ्रष्ट स्थायी समिती सदस्यांवर पक्षांतर्गत कारवाई करावी, त्याचबरोबर एसीबीच्या धाडीत रंगेहात पकडले गेलेले स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांचा भाजपने राजीनामा घ्यावा. अशी मागणी अपना वतन संघटनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्थायी समितीवर एसीबीच्या पथकाने टाकलेल्या धाडीनंतर २१ ऑगस्ट २०२१ रोजी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी लोकमराठी या फेसबुक पेज च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यामध्ये बोलताना त्यांनी सांगितले कि, लाच प्रकरणात...
शिकून जातीपातीच्या बाहेर पडणं गरजेचं | माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

शिकून जातीपातीच्या बाहेर पडणं गरजेचं | माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : "तळागाळातले लोक शिकून मोठे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. परंतु त्यांनी आता जातीपातीतच अडकून न पडता त्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक माणूस म्हणून समाजावर कर्तृत्वाचा ठसा उमटविला पाहिजे", अशा आशयाचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ह्यांनी केले. ते काळेवाडी येथील राजवाडा लॉन्स येथे आयोजित केलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील हे होते. व्हिडिओ पहा https://fb.watch/7mihnlWzG-/ मातंग साहित्य परिषद, महाराष्ट्र ह्या संस्थेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी ह्या दोहोंच्या निमित्ताने ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते. ह्या प्रसंगी पिंपरी येथे संपन्न झालेल्या ८९ व...