मोठी बातमी

कोविड-19 विरुद्धच्या राष्ट्रव्यापी अभियानात एनसीसीचे कॅडेट सहभागी होणार
मोठी बातमी, राष्ट्रीय

कोविड-19 विरुद्धच्या राष्ट्रव्यापी अभियानात एनसीसीचे कॅडेट सहभागी होणार

कॅडेट्सच्या तात्पुरत्या नियुक्त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी नवी दिल्ली, 2 एप्रिल : राष्ट्रीय छात्र सेनेने (एनसीसी) ‘एनसीसी योगदान अभियान’ अंतर्गत आपल्या कॅडेटच्या सेवांचा विस्तार करत कोविड-19 विरुद्धच्या राष्ट्रव्यापी अभियानात नागरी प्रशासनाला मदतीचा हात पुढे केला आहे. साथीच्या आजारा विरुद्धच्या लढाईत सहभागी असलेल्या विविध संस्थाच्या कार्यात आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्यासाठी एनसीसीने त्यांच्या कॅडेट्सच्या तात्पुरत्या रोजगारासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एनसीसी कॅडेट्ससाठी नियोजित कामांमध्ये हेल्पलाइन / कॉल सेंटरचे व्यवस्थापन; मदत पुरवठा / औषधे / अन्न / आवश्यक वस्तूंचे वितरण; समुदाय सहकार्य; डेटा व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना रांगा लावून उभे राहण्याची व्यवस्था आणि रहदारी व्यवस्थापन यांचा समावेश आहे.मार्गदर्शक सूचनांनुसार काय...
कोविड-19 बाबतच्या जनजागृतीसाठी टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा पुढाकार
मोठी बातमी, राष्ट्रीय

कोविड-19 बाबतच्या जनजागृतीसाठी टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा पुढाकार

योग्य माहितीचा स्थानिक भाषेत प्रसार करून समाजातील भ्रामक समजुती दूर करण्याचा उद्देश लोकमराठी न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, 1 एप्रिल : कोरोना हा रोग परदेशात उद्भवला होता, परंतु आम्हाला स्थानिक गरजांनुसार आपल्या लोकसंख्येला हे समजावून सांगावे लागेल, ज्यासाठी ही स्थानिक भाषा महत्त्वाची आहे. आम्हाला आशा आहे की या सामग्रीचा वापर लोकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रभावी ठरू शकेल, असे मत टाटा मूलभूत संशोधन संस्थेने (टीआयएफआर) डॉ. भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. चीनमधील वुहान शहरात प्रथम उद्भवलेल्या कोविड-19 या आजाराने आता संपूर्ण जगच व्यापले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तो साथीचा आजार म्हणून जाहीर केला असून सध्या त्याचा प्रसार 204 देशांमध्ये झालेला आहे. साथीच्या आजाराबरोबरच लोकांमध्ये काळजी, अंधश्रद्धा, भीतीचे वातावरण तयार झाले. अलगीकरण, विलगीकरण, लॉकडाउन यासारख्या अत्यंत महत्वाच्या उपायांची ...
#coronavirus : कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!
मोठी बातमी, महाराष्ट्र

#coronavirus : कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव!

लोकमराठी : कोरोना (covid-19) या आजारावर योग्य उपचार व मनाची सकारात्मकता असेल तर त्यावर विजय मिळविणे कठिण नाही. असे मत एका कोरोनावर मात केलेल्या रूग्णाने व्यक्त केले आहे. या रूग्णाने आपला अनुभव सांगताना म्हटले आहे की, माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी अमेरिकेला गेलो होतो. कोरोना विषाणू संदर्भात भारतात (नागपुरात) परतल्यावर त्यापैकी 3 सहकाऱ्यांना कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह आली. हे ऐकून मी घरीच स्वत:ला क्वारंटाईन केलं. आणि नंतर माझ्या सेाबत आलेल्या मित्रांसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी गेलो. मला असिम्टोटिक कोरोना झाल्याचं निदान झालं. म्हणजे कोरोनाची कोणतीही बाह्य लक्षणं मला नव्हती. तरी मला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. कोरोना असल्याचं कळलं. त्यामध्ये मला मल्टीविटामीनच्या गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दे...
#coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून ५०० कोटींची मदत जाहीर
राष्ट्रीय, मोठी बातमी

#coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून ५०० कोटींची मदत जाहीर

मुंबई : कोरोना व्हायरशी लढाईसाठी टाटा ग्रुपकडून ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी टाटा ट्रस्टकडून नेहमीच योगदान दिलं जाते. टाटा ग्रुपने आताही कोरोनाच्या लढाईत मोठं योगदान दिलं आहे. टाटा कंपनी आणि ग्रुप्सने यापूर्वीही देशावरील संकटात आपलं योगदान दिलं आहे. आताही, देशसेवेत योगदान देण्याची हीच ती वेळ आहे. सध्याच्या काळाजी गरज आणि इतर वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच ती वेळ असल्याचे टाटा यांनी सांगितले आहे. टाटा समूहाकडून वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या खरेदींसाठी ५०० कोटी रुपये देण्यात येत आहेत, असे पत्र रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. https://twitter.com/RNTata2000/status/1243852348637605888 गेल्या ७० वर्षातील...
#lockdown : पिंपरी चिंचवड शहरात भाजीपाला व किराणाचा काळाबाजार
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

#lockdown : पिंपरी चिंचवड शहरात भाजीपाला व किराणाचा काळाबाजार

File photo पिंपरी : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने "लॉकडाऊन" जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या असहयतेचा गैरफायदा घेत अनेक किराणामाल विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांनी जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दरात विक्री सुरु केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत अक्षरशः काळा बाजार सुरू केल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. या संचारबंदीमध्ये शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. दुकाने बंद होतील, टंचाई भासेल या भीतीपोटी नागरीक आपापल्या परिसरात अन्नधान्य, भाजीपाला खरेदी करत गर्दी करत आहेत. याचाच गैरफायदा घेत आहेत. उपनगरातील किराणामाल दुकानात आणि किरकोळ विक्रेते पिंपरी मार्केट मधून होलसेल दरात भुसार माल आणून साठा करून ठेवला आहे. काळा बाजार सुरु करत अनेक रस्त्यावरील विक्रेत्यांनी टोमॉटो, बटाटा, कांदा, हिरवी मिरची जादा दराने विकत आहेत. "हेच कमविण्याचे दिवस आहे...
न्या. लोया मृत्यूप्रकरण तडीस नेऊ – निवृत्त न्या. कोळसे पाटील |अपना वतनचा “अन्नत्याग सत्याग्रह” तात्पुरता स्थगित
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

न्या. लोया मृत्यूप्रकरण तडीस नेऊ – निवृत्त न्या. कोळसे पाटील |अपना वतनचा “अन्नत्याग सत्याग्रह” तात्पुरता स्थगित

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : न्या. लोया प्रकरणात स्वतः लक्ष घालून न्यायालयीन मार्गाने हे प्रकरण तडीस नेहण्याच्या निवृत्त न्या. बी.जी. कोळसे पाटलांच्या आश्वासनाला मान देत अपना वतनचा "अन्नत्याग सत्याग्रह" तात्पुरता स्थगित करण्यात आला. न्या. लोया यांच्या संशयित मृत्यूची फेरचौकशी करण्यासाठी अपना वतन संघटनेच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शनिवारपासून (ता. ७) हे आंदोलन सुरू होते. न्या. लोया यांच्या संशयित मृत्यूची फेरचौकशी करावी, या मागणीसाठी अपना वतन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, त्यास राज्य सरकारने प्रतिसाद न दिल्याने अपना वतन संघटनेच्या वतीने अन्नत्याग सत्याग्रह सुरु करण्यात आला होता. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी भेट दिली....
अंधश्रद्धा निर्मुलन समिती तर्फे ‘एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची’ पर्यावरण पूरक उपक्रम
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

अंधश्रद्धा निर्मुलन समिती तर्फे ‘एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची’ पर्यावरण पूरक उपक्रम

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : एक पोळी होळीची भुकेलेल्या मुखाची हा पर्यावरण पूरक उपक्रमांचे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दरवर्षीप्रमाणे होळीच्या दिवशी आयोजन केले आहे. अनिस पिंपरी चिंचवड शाखा दरवर्षीप्रमाणे सर्व सामाजिक संघटना व शहरातील नागरिकांना आवाहन करते, की आपण होळीच्या सणाला ज्या पूरण पोळ्या अग्नीस नैवेद्य म्हणून अर्पण करतो, त्याच पोळीने एका गरजू भूकेल्याचे पोट भरुया! आपल्या विभागवार टीम, सहकारी मंडळे व स्थानिक सामजिक संघटनांच्या मदतीने हा उपक्रम सोमवार (दि. ९ मार्च) राबवत आहे. होळी हा सण पर्यावरण पूरक व पारंपरिक उत्साहाने साजरा करण्यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिक व मंडळास आपण आवाहन करत आहोत कि, होळी सण साजरा करताना पुढील ठळक मुद्यांचा अवलंब करावाच. परंतु पोळीदान कार्यक्रम जरूर राबवावा. तसेच होळी हि जास्तीत जास्त २/३ फुट उंचीचीच असावी व त्यात आपण पाला पाचोळा व घरातील मो...
लोकसंख्या उत्पादनक्षम झाली तरच भारत महासत्ता बनू शकेल – डॉ. जे. एस. पाटील
मोठी बातमी, पुणे

लोकसंख्या उत्पादनक्षम झाली तरच भारत महासत्ता बनू शकेल – डॉ. जे. एस. पाटील

लोकमराठी न्यूज नेटवर्क औंध : आज १३७ कोटी लोकसंख्येचा तरुण भारत देश आहे. ही लोकसंख्या उत्पादनक्षम झाली तरच भारत महासत्ता बनू शकेल. आजच्या लोकसंख्येला योग्य दिशा देणे व बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे ही आजची खरी आव्हाने आहेत. युवकांच्या हाताला जर काम मिळाले नाही. तर भारत देशाचे महासत्ता होण्याचे स्वप्न अपुरे राहू शकते. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी शासन व्यवस्थेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत डॉ. जे. एस. पाटील यांनी येथे व्यक्त केले. येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, नियोजन व विकास विभाग गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२० रोजी "भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि संधी" या विषयावर करण्यात आले होते. चर्चासत्राचे उद्ध...
दिल्लीतील दंगलीत 10 जणांचा मृत्यू, जाफ्राबादमधील आंदोलकांना हटवले
राष्ट्रीय, मोठी बातमी

दिल्लीतील दंगलीत 10 जणांचा मृत्यू, जाफ्राबादमधील आंदोलकांना हटवले

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या कायद्याला विरोध करणारे आंदोलक आणि या कायद्याचं समर्थन करणारे लोक यांच्यात वादावादी झाली. जाफ्राबागमधून पोलिसांनी आंदोलकांना हटवलं आहे. रविवारपासून आंदोलकांनी इथला रस्ता अडवून धरला होता. सोनवारपासून इथं हिंसाचार सुरु झाला. यामध्ये एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बीबीसीने याबाबत वृत्त दिले आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, दिवसभर सुरू असलेल्या हिंसक घटनांनंतर दिल्लीतल्या चांदबाग, भजनपुरा, ब्रिजपुरी, गोकुळपुरी आणि जाफ्राबाद या भागात 24 तारखेची रात्र भीतीने भरलेली होती. वृत्तांकनासाठी फिरत असताना ओल्ड ब्रिजपुरी भागात सर्फराझ अली भेटले. काकांच्या अंत्यसंस्काराहून ते येत होते. त्यांचे वडील बरोबर होते, त्याचवेळी जमावाने त्यांना घेरलं. "त्यांनी मला नाव विचारलं. मी वेगळं नाव सा...
#Alandi : हरिपाठ न आल्याने महाराजांनी केली मुलाला बेदम मारहाण; मुलाची प्रकृती नाजूक
मोठी बातमी, पुणे

#Alandi : हरिपाठ न आल्याने महाराजांनी केली मुलाला बेदम मारहाण; मुलाची प्रकृती नाजूक

पुणे : आळंदीमध्ये हरिपाठ न आल्याने मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. मुलाची प्रकृती नाजूक असून तो मागील आठ दिवसांपासून कोमात आहे. सध्या त्याच्यावर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ओम राजू चौधरी असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे. तर भगवान महाराज पोव्हणे असे मारहाण करणाऱ्या आरोपी महाराजांचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मुलाची आई कविता राजू चौधरी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार महाराजांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान महाराज पोव्हणे याचे आळंदीत श्री माऊली ज्ञानराज कृपा प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्था आहे. त्यात अनेक मूल अध्यात्मिक शिक्षण घेतात. गेल्या एक वर्षांपासून जखमी ओम देखील त्या ठिकाणी अध्यात्मिक धडे गिरवत आहे. १० ...