अण्णाभाऊ साठेंचे नाव महामानवांच्या यादीत न टाकणे हा केंद्र सरकारचा पूर्वग्रहदूषितपणा | ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची टीका
रामदास आठवलेंच्या घोषणेला मोदी सरकार महत्व देते का? डॉ. राऊत यांचा सवाल
वेशीवर लक्तरे टांगली गेल्यानंतर केंद्राला पश्चातबुद्धी- डॉ. राऊत
आंबेडकर फाउंडेशनचे "ते" उत्तर संतापजनक - डॉ. राऊत
मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्थापन केलेल्या फाउंडेशनला अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांचे नाव माहिती नसावे यावरून या फाउंडेशनच्या कार्यक्षमतेचे वास्तव आणि केंद्र सरकारचा वैचारिक पूर्वग्रहदूषितपणा स्पष्ट होतो,अशी टीका कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे सरकार सध्या केंद्रात सत्तेत असल्याने त्यांना अण्णाभाऊ साठेंच्या नावाची एलर्जी असावी,अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
अण्णाभाऊ साठेंना महापुरुष मानण्यास नकार देऊन केंद्र सरकारने फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कोट्यवधी अनुयायांचा अवमान केला आहे...