शैक्षणिक

Eduacational: Schools, Colleges.
LokMarathi News

रहाटणीतील न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
शैक्षणिक

रहाटणीतील न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी : रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ७३ प्रजासत्ताक दिन उत्साहात सोशल डिस्टंसिन्ग पाळून साजरा करण्यात आला. कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे माजी पोलीस निरीक्षक व समता सैनिक मेजर सुरेश भालेराव, लायन्स क्लब प्रेसिडेंट अंजुम सय्यद, सामाजिक कार्यकर्ते दिपक तरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, मुख्याध्यापिका आसावरी घोडके, सामाजिक कार्यकर्ते राजेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते तात्या शिनगारे, इंदु सूर्यवंशी (लायन्स क्लब सेक्रेटरी), विजया ताकवाले (लायन्स क्लब मेंबर), शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. “देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो....
श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात
शैक्षणिक

श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात

चिंचवड : श्री जैन विद्याप्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच गुरु गणेश कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. समारंभाचे अध्यक्षपद अ‍ॅड. राजेंद्र कुमार मुथा यांनी भुषविले. तसेच सहाय्यक सेक्रेटरी व शाळा समितीचे अध्यक्ष अनिलकुमार कांकरिया यांनी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या स्वागतानंतर सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत अ‍ॅड राजेंद्र कुमार मुथा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजगीत व राष्ट्रगीताने ध्वजास मानवंदना देण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनिता नवले यांनी प्रास्ताविक केले. त्यानी आपल्या मनोगतातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. इंदापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रौढ मैदानी स्पर्...
यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
शैक्षणिक

यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पिंपरी : यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, यशस्वी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे सचिव डॉ. तुषार देवकाते, डॉ. स्वप्नील देवकाते आदी मान्यवराच्या उपस्थितीत ध्वजारोहन मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयाने इयत्ता पहिली ते दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चित्रकला व निबंध लेखन स्पर्धा घेतली. इयत्ता पहिली ते पाचवी या गटाच्या चित्रकला स्पर्धेमध्ये श्रवण डिगे या विध्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला. इयत्ता सहावी ते आठवी या गटाच्या चित्रकला स्पर्धेमध्ये रिद्धी सातपुते या विद्यार्थिनींचा प्रथम क्रमांक आला. इयत्ता नववी ते दहावी या गटाच्या निबंध स्पर्धेमध्ये शिवानी धन...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये #AIR Next स्पर्धेचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये #AIR Next स्पर्धेचे आयोजन

हडपसर (प्रतिनिधी) : देशाच्या विकासात युवकांचे स्थान मोलाचे आहे. युवकांना संधी मिळावी म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांनी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपले विचार व्यक्त करावेत. असे विचार आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम प्रमुख इंद्रजीत बागल यांनी व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमधील मराठी विभाग आणि आकाशवाणी केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त "युवकांसाठी #AIR Nxt विशेष स्पर्धा 2021-22" तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त भाषण स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा व कथाकथन इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी, स्पर्धा प्रमुख मुजमिल पटेल यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, युवकांमधील टॅलेंट शोधण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आह...
अभिमान स्कूलमध्ये मकरसंक्रांत ऑनलाईन साजरा
शैक्षणिक

अभिमान स्कूलमध्ये मकरसंक्रांत ऑनलाईन साजरा

निगडी : प्राधिकरण मधील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये मकरसंक्रांत हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने इयत्ता पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पतंगाच्या आकाराचे सुंदर भेटकार्ड बनवले. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी तिळगुळाचे दागिने (हलव्याचे दागिने) बनविले. इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर ‌पतंग तयार करून त्यावर सामाजिक संदेश लिहीला. सर्व विद्यार्थ्यांना मकरसंक्रांत का‌? व केव्हा? साजरी केला जाते, या विषयाची माहिती शिक्षकांनी दिली. या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांनी मार्गदर्शन केले....
समाजाला जागे करण्यासाठी पत्रकारांनी जागल्याची भूमिका वठवावी – प्रा. डॉ. संदीप कांबळे
पुणे, शैक्षणिक

समाजाला जागे करण्यासाठी पत्रकारांनी जागल्याची भूमिका वठवावी – प्रा. डॉ. संदीप कांबळे

हडपसर (प्रतिनिधी) : पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतो. लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारिता सुरू केली. समाजाला जागे करण्यासाठी पत्रकारांनी जागल्याची भूमिका वठवावी. मुखवटे धारण करणारी पत्रकारिता नसावी. समताभाव निर्माण करणारा विचार वर्तमानपत्रातून व्यक्त झाला पाहिजे. असे विचार प्रा. डॉ. संदीप कांबळे यांनी व्यक्त केले. हडपसर येथील एस. एम .जोशी कॉलेजमध्ये पत्रकार दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाईन माध्यमातून ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग व मास कमुनिकेशन अँड जर्नालिझम या विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे बोलत होते. ते म्हणाले की, "लोकशाही संस्कृतीला पोषक जबाबदार नागरिक तयार करण्याचे काम पत्रकार करतात. लेखणीच्या...
एस .एम .जोशी कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती समारंभ संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस .एम .जोशी कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले जयंती समारंभ संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : भारताच्या पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. आज सर्व क्षेत्रात मुलींनी आपले श्रेष्ठत्व दाखवले आहे. कोणत्याही राष्ट्राची प्रगती ही शिक्षणावर मोजली जाते. फुले दांपत्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या योगदानामुळेच आज महिला वर्ग शिकत आहे. समाज सुधारणेचे कार्य शिक्षणामुळे होऊ शकते. सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. असे विचार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केले. ते एस. एम. जोशी कॉलेजमधील सावित्रीबाई फुले जयंती समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर येथील मानसशास्त्र विभागाच्या डॉ.योगिता खेडकर यांनी "स्त्री-पुरुष समानता" या विषयावर आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही मानाचे, समतेचे स्थान मिळायला पाहिजे. आज स्त्रियांना समान संध...
“विठ्ठल रामजी शिंदे हे खरे महर्षी” – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

“विठ्ठल रामजी शिंदे हे खरे महर्षी” – डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले पिंपरी : “शेतकरी, कामगार, देवदासी, अस्पृश्य समाज यांच्या उद्धारासाठी निस्पृह वृत्तीने विठ्ठल रामजी शिंदे यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यामधील दुवा म्हणजे वि. रा. शिंदे यांचे कार्य. विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर निस्पृह वृत्तीने काम केले. ते खऱ्या अर्थाने महर्षी या पदवीला पात्र होते. त्यांच्या उपेक्षित कार्याला समाजापुढे आणण्याचे काम रयत शिक्षण संस्थेने केले.” असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी येथे मांडले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले...
अभिमान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
शैक्षणिक

अभिमान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

पिंपरी : निगडी प्राधिकरण मधील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये सोमवारी (ता. ३ जानेवारी) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती म्हणजेच 'बालिका दिवस' साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट, सामाजिक कार्य तसेच शिक्षणाचे महत्त्व शाळेतील शिक्षकांनी आपल्या भाषणातून दिले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या देशातील पहिली महिला शिक्षिका आहेत तसेच समाजसेविका सुद्धा आहेत. समाजातील मुलींचे स्थान अधिक चांगले होण्यासाठी व सामाजिक भेदभाव कमी होण्यासाठी त्याचीच आठवण व स्मरण होण्यासाठी आजचा दिवस 'बालिका दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या कार्यक्रमास वालचंद संचेती यांचे सहकार्य लाभले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांच्याकडून प्रतिमेचे पूजन करण्यात आले....
एस.एम.जोशी महाविद्यालयात शिक्षक कृतज्ञता दिन साजरा
शैक्षणिक

एस.एम.जोशी महाविद्यालयात शिक्षक कृतज्ञता दिन साजरा

हडपसर : एस.एम.जोशी महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातील विध्यार्थ्याकडून शिक्षक कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. गेली दोन वर्षापासून कोरोनामुळे महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाईन पद्धतीने चालू असल्या कारणाने विद्यार्थ्यांना शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन तसेच यासारखे इतर दिवस साजरे करता आले नाहीत. कोरोना परिस्थिती व लॉकडाऊन असतानाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी शिक्षक अविरतपणे ऑनलाईन पद्धतीने तसेच प्रसंगी ऑफलाईन पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एस. एम. जोशी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी शिक्षक कृतज्ञता दिन साजरा केला. या प्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. एकनाथ मुंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अर्थशास्त्र विभा...