सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
पिंपरी चिंचवड : हृदयाला जोडणारी मुख्य धमनी फाटलेल्या २१ वर्षीय तरूणावर सिनेर्जी हार्ट इन्स्टिट्यूट हॉस्पिटलमध्ये जटील अशी बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या करण्यात आली. सुमारे सात ते आठ चालणाऱ्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी आपली सर्व कौशल्ये पणाला लावून तरूणाला जीवनदान दिले.
या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत ह्रदय रोग तज्ञ डॉ. गौतम जुगल (Dr Gautam Jugal) व डॉ. सचिन हुंडेकरी (Dr Sachin Hundekari) , ह्रदय शल्य चिकित्सक डॉ. स्मृती हिंदारीया (Dr Smurti Hindaria) , भुलतज्ञ डॉ. सुहास पाटील (Dr Suhas Patil) यांचा सहभाग होता.
अक्षय माने असे या तरूणाचे नाव असून छातीत व पाठीत तिव्र वेदना आल्यामुळे तो सिनेर्जी हॉस्पिटल येथे आला असता, ह्रदय रोग तज्ञ डॉ. गौतम जुगल यांनी पुर्ण तपासणीअंती, त्याला एओर्टिक एन्युरिझम (महाधमनी विकार) व टाईप-ए-एओर्टीक डिसेक्शन म्हणजेच महाधमनी विच्छेदन असल्याचे निदान क...