विशेष लेख

भारतीय संविधान; जाणून घ्या १० महत्त्वाच्या गोष्टी
विशेष लेख

भारतीय संविधान; जाणून घ्या १० महत्त्वाच्या गोष्टी

दीपक मोहिते देशभरात 'संविधान दिवस' साजरा करण्यात येत आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. या निमित्ताने देशभात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्तानं जाणून घेऊया संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी. १) २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती. २) संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला? संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस,या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं. ३) कसं लिहीलं गेलं संविधान? आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याची जबाबदारी त्या...
वृक्ष संवर्धनासाठी हवी मानसिकता
विशेष लेख

वृक्ष संवर्धनासाठी हवी मानसिकता

संदीप रांगोळे, वृक्षप्रमी वृक्ष लावा, वृक्ष जगवा हे आवाहन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आपण नेहमीच एकतो आहे. त्यासाठी बेसुमार होणारी वृक्षतोड थांबली पाहिजे. नवीन वृक्ष लागवडीबरोबरच ती जगवायला हवी, याबाबात जनजागृती केली जाते. मात्र, ही जनजागृती व आवाहनांचा किती परिणाम झाला किंवा होतो आहे, हे पिंपरी चिंचवड शहरासह उपनगराच्या विविध भागात अव्याहतपणे होत असलेल्या वृक्षतोडीतून स्पष्ट होत आहे. पावसाळ्यात झाडे लावण्याचे कार्यक्रम पार पाडले जातात व त्या कार्यक्रमांचे फोटो माध्यमांमधून छापून आणले जातात. एकदा अशा कार्यक्रमांमधून फोटो छापून आले की, लावलेल्या झाडांचे काय झाले, ती जगली की नष्ट झाली, याकडे तेवढ्याच तत्परतने बघितले जात नाही. सध्या पिंपरी चिंचवड शहरात बांधकामांना अथवा रस्त्यांना अडथळा ठरणारी झाडे बेमुर्वतपणे तोडली जात आहेत. खासगी जागेतील झाडे तोड...
महाराष्ट्र हित महत्त्वाचे! जनमताचा आदर व्हायला हवा!
विशेष लेख

महाराष्ट्र हित महत्त्वाचे! जनमताचा आदर व्हायला हवा!

काँग्रेसचे तरुण नेते शिवसेनेसोबत सत्तेसाठी उत्सुक! शीतल करदेकर काँग्रेस पक्षाचे मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे काँग्रेस पक्षासाठी हितकारक कधी होते. याचा शोध आणि बोध पक्षाने घेण्याची वेळ आली आहे. बदलत्या राजकीय समीकरणात अनेक पक्ष प्रादेशिक पातळीवर सहकार्य करून सत्ता स्थापन करत आहेत, त्यात भारतीय जनता पार्टी पक्ष आघाडीवर आहे. सत्ता मिळवणे आणि मिळवलेल्या सत्तेचा लोकहितासाठी उपयोग करणे हा उद्देश मुख्यता असायला हवा. मात्र, मागील अनेक वर्षात जुनी राजकारण बदलून व्यक्तिकेंद्री राजकारणाला खतपाणी मिळाले आहे. विविध पक्ष, त्यात विविध गट आणि सत्ताकेंद्रे तयार झालीत. विविध प्रांतात अनेक वतनदार तयार झाले. शिक्षण महर्षी, कार्यसम्राट, कारखानदार आणि आता व्यापारी वाढले! मिळालेल्या सत्तेचा गैरवापर न करता जनतेचे पालक म्हणून काम करणे, हाच मुख्य उद्देश असायला हवा हे बहुसंख्य राजकारणी विसरले...
आझाद : भारतरत्न नाकारणारा अवलिया
विशेष लेख

आझाद : भारतरत्न नाकारणारा अवलिया

कलीम अजीम भाजपशासित सत्ताकाळात हिंदु-मुस्लिम ऐक्याला सुरुंग लागली असताना राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार करणारे मौलाना आझाद सहज आठवून जातात. मुसलमानांनी काँग्रेसशी जोडून घेणे हे त्यांचं धार्मिक कर्तव्य आहे, असं सांगणारे आझाद काँग्रेसने मुसलमानांच्या केलेल्या अवमानामुळे स्मरून जातात. निवडणुकीतील मतांसाठी हिंदुत्वाची लाईन घेत असताना मुसलमानांमुळे काँग्रेसचे नुकसान झाले, असेही म्हणण्यास काँग्रेसवाले कचरत नाहीत. सेक्युलर म्हणवणारा हा राष्ट्रीय पक्ष जेव्हा आपल्या अपयशाचं खापर मुस्लिमांवर फोडतो, त्यावेळी मौलाना आझादांचे काँग्रेसप्रती असलेलं प्रेम आणि त्याग आठवून; हा तोच काँग्रेस आहे ना! असा संभ्रम मनात तयार होतो. भाजपशासित सत्ताकाळात धर्माच्या नावावर मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. मुस्लिमांची मतं घेऊन लोकशाही मार्गाने सत्तेत आलेला भाजप जेव्हा मुस्लिममुक्त भारताची भूमिका घेतो, त्यावेळी मुस्लिमां...
शिवसेना का अडली?
विशेष लेख

शिवसेना का अडली?

मोठ्य सुधारणेची गरज आहे! शीतल करदेकर राज्यपाल भेटीला गेलेले शिवसेना दिग्गज हाती सर्व कागदपत्रे घेऊन जाताहेत! आता झालं..महाराष्ट्रात सत्ता स्थापन होणार! सत्तानाट्य संपणार! शरद पवारांकडून सहकार्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्ण समर्थन आहे. काँग्रेससोबत चर्चा सकारात्मक आहे. नवीन समिकरणं आणि लोकहिताच्या कार्यक्रमावर महाशिवआघाडी काम करणार असे वाटत असतानाच,कळले की आवश्यक कागदपत्रेच नाहीत. पाठिंब्याची पत्रे आमदार माहिती सहीसह नाहीत! शिवसेनेला मुदतवाढ देण्यास महामहिम राज्यपालांनी नकार दिला असला तरी सेना काय भाजपा काय संख्याबळ असेल तर सत्तेसाठी दावा करू शकते. राष्ट्रवादी, काँग्रेस सत्तास्थापनेस पुढे आली तरी शिवसेना सोबत असेल तरच हे शक्य आहे. मग पुन्हा मुख्यमंत्री कार्यकाळ वाटप होऊ शकत.. सगळं होऊ शकतं पण माती कुणी खाल्ली याचा तपास करून अचूकतेने काम होणं गरजेचं आहे. युतीपर्वाची अखेर ...
सर्वसामान्यांच्या नजरेतुन साहेब
विशेष लेख

सर्वसामान्यांच्या नजरेतुन साहेब

अॅड. बाळासाहेब आ. खोपडे मी राष्ट्रवादी पक्षाचा सभासद नाही समर्थकही नाही. किंवा पवार साहेबांना भेटलोही नाही. उलटपक्षी माझे मोठे बंधू सुरेश खोपडे (IPS rtd.) यांनी सुप्रीयाताई सुळे यांचे विरूध्द लोकसभेची निवडणूक लढवीली होती. तरीही माझ्या सर्वासामान्य नजरेने दिसलेले पवार साहेब यांचेबद्दल लिहीलेला लेख इडीच्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रसिध्द करित आहे. "सर्वसामान्यांच्या नजरेतुन साहेब" साधारण १९६७-६८ साल असावे. मी ५ वी किंवा सातवीत असेल. आमच्या मोरगांवातील आमची मराठी शाळा एका टोलेजंग वाड्यात भरत असे. दगडी व विटांचा भलाथोरला बुरूज. खुप मोठा भव्य लाकडी दरवाजा त्यावर मोठाले बाहेरच्या बाजुस टोक काढलेले जाडजुड खिळे. बहुतेक हत्तीने धडका देउ नये म्हणून बसवलेले असावे अस सांगितलं जायच. दरवाजाला उजव्या बाजुस खाली चौकोणी लहान दिंडी दरवाजा ठेवलेला. दारातुन आत गेल की उजव्या बाजुला चौथरा...
माहिती अधिकार कायद्याला विनम्र श्रद्धांजली – विश्वंभर चौधरी
विशेष लेख, मोठी बातमी

माहिती अधिकार कायद्याला विनम्र श्रद्धांजली – विश्वंभर चौधरी

विश्वंभर चौधरी थरारक सूडनाट्य. मुख्य माहिती आयुक्तांनी पंतप्रधान कार्यालयाला माहिती देण्याचे फर्मावले म्हणून मोदी शहांनी त्यांचा सूड घेतला. मुख्य माहिती आयुक्तांसह राज्यातील सर्व माहिती आयुक्त काल संसदेत मंजूर झालेल्या सुधारणा कायद्यानुसार आता मोदी-शहांच्या थेट नियंत्रणात आले आहेत. कोणत्याही पदाला निर्धारित कालमर्यादा असते. माहिती आयुक्तांचा कार्यकाळ कायद्यानुसार पाच वर्षांचा आहे. मात्र, काल लोकसभेत पाशवी बहुमताचा गैरवापर करून मोदींनी हा कार्यकाल रद्द केला असून केंद्र सरकार आता वाट्टेल त्या वेळी आयुक्तांना दूर करू शकते. त्यांचे पगारही आता केंद्र सरकार ठरवेल. थोडक्यात काय तर मुख्य माहिती आयुक्तांसह सगळ्याच राज्यांचे माहिती आयुक्त आता मोदी शहांचे घरगडी झालेले आहेत. त्यांचा पगार तुमच्या करातून जाणार आहे. मात्र, त्यांच्यावर मालकी मोदी शहांची असणार आहे. या कायद्यात नियम करण्याचे ...
विशेष लेख

बोलावणे मिशनरीसेवा व्रताचे आणि पत्रकारीतेचे

कामिल पारखे रविवारची मिस्सा संपल्यावर मी माझ्या वडिलांचे बोट धरून चर्चच्या समोरील मोकळ्या जागेत उभा होतो. देवळातून बाहेर पडणारे लोक आपसांत बोलत उभे होते. श्रीरामपूरला अलिकडेच बदली होऊन आलेले ते तरुण धर्मगुरू घोळक्याने उभे असलेल्या लोकांशी बोलत होते. फादर प्रभुधर यांचे व्यक्तिमत्व अगदी देखणे असेच होते. वक्तृत्वशैलीची देणगी लाभलेल्या फादरांच्या ओघवत्या उपदेशांनी लोक प्रभावित होत असत. भरपूर उंचीचे फादर आपल्या पांढऱ्या झग्यात फिरत होते, तसे त्यांना 'जय ख्रिस्त' म्हणून अभिवादन करण्यासाठी लोक त्यांच्याकडे वळत होते. आमच्याकडेही ते आले आणि माझ्या वडिलांशी बोलू लागले. हरेगावचे मतमाऊली तीर्थक्षेत्र आणि (शेजारी) बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे बोलत असताना मध्येच थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, ''पारखे टेलर, तुम्हाला किती मुले आहेत? आणि त्यांच्यामध्ये याचा नंबर कितवा?'' माझ्या वडिला...
पंचहौद मिशन चहापान, भारतीय पत्रकारितेतील पहिले स्टिंग ऑपरेशन
विशेष लेख

पंचहौद मिशन चहापान, भारतीय पत्रकारितेतील पहिले स्टिंग ऑपरेशन

कामिल पारखे गोपाळराव जोशी हे अर्वाचीन महाराष्ट्रातील एक वादग्रस्त पात्र आहे. अमेरिकेत जाऊन डॉक्‍टर होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला असलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पती अशीच गोपाळराव जोशी यांची प्रामुख्याने ओळख आहे. पुण्यातील त्याकाळच्या अनेक थोर व्यक्तींना गणपतरावांनी आपल्या विविध चाळ्यांनी आणि उपद्‌व्यापांनी घाम फोडला होता. पुण्यातील पंचहौद चर्चमधील चहापान किंवा ग्रामण्य प्रकरण या गोपाळरावांनी निर्माण केलेल्या वादात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, न्यायमुर्ती म. गो. रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे वगैरेंसारखे भलेभले लोक अडकले. पंचहौद चर्च-पवित्र नाम देवालय किंवा होली नेम कॅथेड्रल विशेष म्हणजे हे चहापान प्रकरण हा वाद गोपाळरावांनी अगदी ठरवून, त्यात अनेक लोकांना गोवून घडवून आणला होता आणि नंतर पुणे वैभव या वृत्तपत्रात आपल्या बायलाईनसह बातमी छापून त्यात पुण्यातील या ...
वैज्ञानिक संमोहनविद्या शास्त्राचे जनक: गोव्याचा सुपुत्र ऍबे डी फरिया
विशेष लेख

वैज्ञानिक संमोहनविद्या शास्त्राचे जनक: गोव्याचा सुपुत्र ऍबे डी फरिया

'' ही सोगली भाजी, कातोर रे भाजी! '' कामिल पारखे आपण जर गोव्यातील पणजीला कधी गेला असाल तर तेथील मांडवीच्या तीरावर असलेला आदिलशाही राजवाडा किंवा जुने सचिवालय तुम्ही नक्‍कीच पाहिले असेल. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चला पणजीत होणाऱ्या कार्निव्हलची मिरवणूक येथूनच पुढे सरकत असते. या मध्ययुगीन काळातील राजवाड्याच्या दोन्ही बाजूच्या प्लाझांवर दोन पुतळे उभारण्यात आलेले आहेत. या दोन पुतळ्यांपैकी एक पुतळा गोवा, दमण आणि दीवचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा आहे. राजवाड्याच्या दुसऱ्या बाजूला असलेला पुतळा कुणाच्याही मनात कुतुहल निर्माण करेल अशा स्थितीत आहे. या पुतळ्यामधे एक मनुष्य आपले दोन्ही हात उभारून एका स्त्रीला संमोहित करण्याचा प्रयत्न करत आहे असे जवळून निरीक्षण केल्यास दिसून येते. हा पुतळा 18 व्या शतकातील युरोपमधील वैज्ञानिक सोंहनविद्या शास्त्राचे जनक आणि गोव्याचे सुपुत्र ऍबे डी फ...

Actions

Selected media actions