विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करिअर करा; राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे आवाहन
'एमआयटी एडीटी' विद्यापीठाचा ७ वा दीक्षांत समारंभ उत्साहात
पुणेः विद्यार्थी हा उद्याच्या विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. भारताच्या या युवा पिढीने कधीही हताश न होता, शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्विरित्या करिअर करावे. विद्यार्थ्यांनो दुसऱ्याच्या यश-अपयशाचा विचार न करता, केवळ आपले काम, प्रतिभा व तत्वांवर ठाम राहून कष्ट केल्यास कुठल्याही क्षेत्रात यश नक्कीच मिळते, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी मांडले.
ते येथे आयोजित एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या ७व्या दिक्षांत समारंभा प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, प्रतिष्ठित शास्त्रज्ञ इस्रो तथा यु.आर.राव उपकेंद्र, बंगळुरूचे संचालक डाॅ. एम. शंकरन, एमआयटी एडीटी विद्या...