अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा पूर्णपणे बीमोड करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात २८ नवीन वाहने दाखल
शिर्डी : "जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांतील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी व वाढलेला अमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी. गुन्हेगारीचा पूर्णपणे बीमोड झाला पाहिजे," असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले.
शिर्डी येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलास (Ahilyanagar Police) प्रदान करण्यात आलेल्या २८ चारचाकी वाहनांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे) Somnath Gharge), साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श...








