महाराष्ट्र

धक्कादायक : साचलेल्या ड्रेनेज व पावसाच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा | पादचारी मार्गाची श्री दत्त कृपा मित्र मंडळ गोविंदा पथकाची मागणी
मोठी बातमी, महाराष्ट्र

धक्कादायक : साचलेल्या ड्रेनेज व पावसाच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा | पादचारी मार्गाची श्री दत्त कृपा मित्र मंडळ गोविंदा पथकाची मागणी

मुंबई : बदलापूरच्या बेलवली परिसरामध्ये भुयारी मार्गात पावसाच्या पाण्यासह ड्रेनेजचे पाणी साचत असल्याने नागरिकांना त्यातूनच वाट काढत जावे लागते. नुकताच या मार्गातून वाट काढत अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत नेण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बेलवली परिसरातील रहिवासी रामचंद्र पाटील यांचे सोमवारी मध्यरात्री रात्री निधन झाले. मंगळवारी (ता. १४,सप्टेंबर) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, अंबरनाथ-बदलापूर रेल्वेमार्गाखालील भुयारी मार्गात पावसाच्या पाण्यासह ड्रेनेजचे पाणी साचल्याने या मार्गातून अंत्ययात्रा नेताना नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. घडलेल्या या प्रकाराची माहिती सोशल मिडीयावर पसरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. रेल्वेचे फाटक बंद केल्याने भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, या ठिकाणी साचणाऱ...
महीला-मुलींनो कुणी त्रास देत असेल तर निर्भयपणे पुढे या! पोलिस तुमच्या पाठीशी, तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल!
महाराष्ट्र, मोठी बातमी

महीला-मुलींनो कुणी त्रास देत असेल तर निर्भयपणे पुढे या! पोलिस तुमच्या पाठीशी, तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल!

कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आवाहन कर्जत : 'महिला-मुलींनो तुम्हाला जर कुणी ज्ञात-अज्ञात त्रास देत असेल तर मनात कोणतीही भीती न बाळगता बिनधास्तपणे पुढे या.कर्जतच्या पोलीस ठाण्यात किंवा तुम्हाला शक्य असेल त्या दुरक्षेत्रात तक्रार द्या.तुमच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करून होणाऱ्या त्रासापासून तुमची कायमची सुटका केली जाईल' असे आवाहन कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे. महिला-मुलींच्या सुरक्षीततेसाठी व त्यांच्या मनात असलेली भीती घालवण्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्यासाठी कर्जत पोलिसांनी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यातील अनेक शाळा-महाविद्यालयात जाऊन हजारो विद्यार्थिनींशी संवाद साधला आहे. पोलीसांनी सुरू केलेल्या 'भरोसा सेल' तसेच अनेक उपाययोजनांची माहिती त्यांना पटवून दिली आहे. ...
साकीनाका घटना निंदनीय! फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

साकीनाका घटना निंदनीय! फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई, दि ११ : साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले....
Video : लालबाग राजाच्या दरबारात पोलीस निरीक्षक संजय निकम यांची पत्रकारांना धक्काबुक्की | एनयुजेएमची कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

Video : लालबाग राजाच्या दरबारात पोलीस निरीक्षक संजय निकम यांची पत्रकारांना धक्काबुक्की | एनयुजेएमची कारवाईची मागणी

मुंबई : प्रसिद्ध लालबागचा राजा दरबारात पोलिसांनी पत्रकारांना आरेरावी करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक संजय निकम यांचा पत्रकारांना अरेरावी आणि धक्काबुक्की करत असल्याचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय. आज सकाळी पोलिसांच्या कडक निर्बंधांमुळे आधी श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब झाला. त्यानंतर लालबागचा राजा मंडळात एकानंतर एक वाद होताना दिसत आहेत. 'हात काय, पाय पण लावेन… पोलीस निरीक्षक संजय निकम स्वतः तर मास्क घातला नव्हता. आणि एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराने पास दाखवूनही त्याला आत सोडण्यात आले नाही. उलट त्याला धक्काबुक्की केली. तसेच, पत्रकारांनी हात लावू नका असे म्हटल्यावर, ''हात काय, पाय पण लावेन'', अशी गुंडगिरीची भाषा वापरली. त्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशिवाय इतर पत्रकारांनाही बॅरिकेडच्या बाहेर काढण्यात आले. यावेळीही निकम यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचे कॅमेऱ्यात ...
उल्लेखनीय : भरोसा सेलमुळे कर्जत उपविभागात ७२ दांपत्यांचा संसार सुरळीत
मोठी बातमी, महाराष्ट्र

उल्लेखनीय : भरोसा सेलमुळे कर्जत उपविभागात ७२ दांपत्यांचा संसार सुरळीत

अहमदनगर : कर्जत पोलीस उपविभागातील भरोसा सेल कडून अनेक दांपत्य आणि पीडित पुरुष व महिलांचे समुपदेशनाद्वारे संसार सुरळीत करण्याच्या प्रयत्नांना यश आले असून या भरोसा सेल मुळे अनेकांचे प्रपंच मार्गाला लागले आहे. यात कर्जत उपविभागात एकूण ७२ प्रकरणात समझोता होऊन त्यांच्या आयुष्याच्या निसटलेल्या रेशीमगाठी पुन्हा घट्ट झाल्याने कुटूंबासह नातेवाईकांतही समाधानाचे वातावरण आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून पोलीस उपविभागासाठी भरोसा सेलसह या सेलचे अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी ग्रामीण भागाच्या अडचणी पाहता कर्जत जामखेड पोलीस ठाण्यात महिलांच्या सुरक्षेसाठी खेडोपाडी तात्काळ पोहचण्यासाठी चार दुचाकी दोन चार चाकी(योद्धा वाहने)कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली.यामुळे महिलांच्या तक्रारीकामी याद्वारे थेट मदत मिळते आहे. गुन्हेगारी ...
माझ्यावर गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे – केंद्रीय मंत्री नारायण राणे
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

माझ्यावर गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे – केंद्रीय मंत्री नारायण राणे

मुंबई : माझ्यावर सरकारने चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून बेकायदेशीर पद्धतीने गुन्हे दाखल करणे हा राजद्रोह आहे. राज्यसरकारने सुडाचं राजकारण करू नये. असे वक्तव्ये केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. भाजपचे मंत्री नारायण राणे यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर राणे यांनी याबाबत त्यांच्या फेसबुक पेजवरून आपले म्हणणे मांडले आहे. दरम्यान, मंत्री राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक चिपळूणला रवाना झाले असून कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. ...
डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अविनाश सांगोलेकर, डॉ. अंबादास सगट यांना मातंग साहित्य परिषदेचा पुरस्कार | उद्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते वितरण
महाराष्ट्र

डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अविनाश सांगोलेकर, डॉ. अंबादास सगट यांना मातंग साहित्य परिषदेचा पुरस्कार | उद्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते वितरण

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त उद्या मातंग साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. काळेवाडीतील राजवाडा लॉन्स येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील असतील. अशी माहिती मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. धनंजय भिसे यांनी दिली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अविनाश सांगोलेकर, यांना समाजमित्र व डॉ. अंबादास सगट यांना समाजरत्न पुरस्काराने, तर डॉ. बाबासाहेब शेंडगे व डॉ. राजाभाऊ भैलुमे यांना समाजबंधु पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच डॉ. प्रिया गोरखे व जालिंदर कांबळे यांना ही विशेष सन्मानाने गौर...
स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्या ई-कॉमर्स संकेतस्थळे आणि दुकानांवर कायदेशीर कारवाई करा – सुराज्य अभियान
महाराष्ट्र, मोठी बातमी

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्या ई-कॉमर्स संकेतस्थळे आणि दुकानांवर कायदेशीर कारवाई करा – सुराज्य अभियान

मुंबई : ‘भारतीय राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांसाठी अस्मितेचा विषय आहे; काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. असे असले, तरी या संवेदनशील विषयी ‘रेड-बबल’सारख्या ‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळांद्वारे, तसेच दुकानांत आणि रस्त्यावर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेल्या ‘मास्क’ची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे. त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशा मास्कची विक्री, उत्पादन आणि वितरण होणार नाही, या दृष्टीने शासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शहा यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. https://youtu.be/9oCLG_crkw4 राष्ट्र...
चित्रपटाचे आकर्षण! हरियाणा, राजस्थानहून मुलगा-मुलगी गायब | शोधण्यास मदत करण्याचे पालकाचे आवाहन
महाराष्ट्र, मोठी बातमी

चित्रपटाचे आकर्षण! हरियाणा, राजस्थानहून मुलगा-मुलगी गायब | शोधण्यास मदत करण्याचे पालकाचे आवाहन

मुंबई : हरियाणातील मुलगा व त्याची फेसबुकवरील राजस्थानातील मैत्रीण दोघेही जानेवारी महिन्यापासून गायब आहेत. अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. मुलीला चित्रपट क्षेत्राचे आकर्षण असल्याने ते दोघेही मुंबईत असल्याची शक्यता आहे. या दोघांना शोधण्यास मदत करण्याचे पालकांनी आवाहन केले आहे. राजेश चुघ (रा. घर नंबर 512/ 21, गल्ली नंबर 1, नरेंद्रनगर, सोनीपत हरियाणा) यांचा मुलगा सौरभ चुघ (वय 18, उंची 5 फूट 11 इंच) हा घरातून 29 जानेवारी 2021 पासून गायब आहे. याप्रकरणी सोनीपत सिव्हिल लाईन पोलिसमध्ये फिर्याद दिली आहे. तर या मुलाची फेसबुकवर नंदिनी या एका मुलीशी मैत्री झाली. ती राजस्थानची राहणारी असून तीही त्याच दिवसापासून तिच्या घरातून गायब झाली आहे. नंदिनीला चित्रपट क्षेत्राचे आकर्षण असल्याचे तिच्या मेल्सवरून निश्चित होते आहे. ही दोन्ही मुले मुंबईत आहे असे समजते. सौरभचा मोबाईल नंबर 82...
‘झाडांचे शतक शतकांसाठीची झाडं’ | सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संवेदनेतून अभिनव उपक्रम
महाराष्ट्र, मोठी बातमी

‘झाडांचे शतक शतकांसाठीची झाडं’ | सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संवेदनेतून अभिनव उपक्रम

https://youtu.be/a6xglBW-B7E मुंबई : सहयाद्री देवराई व सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने, "झाडांचे शतक, शतकांसाठीची झाडं" हा एक अभिनव उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे. सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या झाडं आणि निसर्गाबद्दल असलेल्या संवेदनेतून आणखी एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. राज्यभर सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांच्या कक्षेत बसणाऱ्या सर्व गावात लोकसहभागातून राबविला जात आहे. आणि या उपक्रमास महाराष्ट्र भरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सरपंच परिषदे व्यतिरिक्त स्थानिक लोकं आणि स्थानिक सामाजिक संस्था ही या उपक्रमात आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवत आहेत. संकल्पना : १५ ऑगस्ट २०२१ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, ह्या निमित्ताने आपण आपल्या गावातील ७५ वर्षीय आणि त्यावरील वयाच्या आजी आजोबांचा सत्...