‘झाडांचे शतक शतकांसाठीची झाडं’ | सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संवेदनेतून अभिनव उपक्रम
https://youtu.be/a6xglBW-B7E
मुंबई : सहयाद्री देवराई व सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने, "झाडांचे शतक, शतकांसाठीची झाडं" हा एक अभिनव उपक्रम राज्यभरात राबविण्यात येत आहे. सुप्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या झाडं आणि निसर्गाबद्दल असलेल्या संवेदनेतून आणखी एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. राज्यभर सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांच्या कक्षेत बसणाऱ्या सर्व गावात लोकसहभागातून राबविला जात आहे. आणि या उपक्रमास महाराष्ट्र भरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सरपंच परिषदे व्यतिरिक्त स्थानिक लोकं आणि स्थानिक सामाजिक संस्था ही या उपक्रमात आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवत आहेत.
संकल्पना : १५ ऑगस्ट २०२१ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत, ह्या निमित्ताने आपण आपल्या गावातील ७५ वर्षीय आणि त्यावरील वयाच्या आजी आजोबांचा सत्...










