क्रांती दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून ११ हजारांहून अधिक पत्रे पाठविणार
बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ११ हजारांहुन अधिक पत्रे पाठविण्यात येणार आहेत. या मोहिमेत सहभागी होऊन बेळगाव व इतर भागातून देखील मोठ्या प्रमाणात पत्रे पाठविली जावी यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेला मराठी वकील संघटनेतर्फे पाठींबा देण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाची तातडीने सोडून व्हावी यासाठी प्रयत्न करा अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याचा निर्णय खानापूर तालुका युवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसेच 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी एकाच दिवशी ११ हजाराहून अधिक पत्रे पाठविण्याबाबत जनजागृती केली जात आहे. याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून फक्त खानापूर तालुका नव्हे. तर बेळगाव, निपाणी व इतर सीमाभागातून देखील पत्रे पाठविली जावीत याला सिमाभागा...