शहरात विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करा – मनीषा गटकळ यांची मागणी
बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक नगरी म्हणून संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. परंतु याच औद्योगिक नगरीमध्ये वाहतूक व्यवस्था ही संपूर्णपणे ढिसाळ झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे ती पूर्वपदावर आणावी यासाठी राष्ट्रवादी अर्बन सेल च्या वतीने उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.
प्रदेशाध्यक्षा आणि खासदार अडव्होकेट सौ.वंदनाताई चव्हाण यांचे आदेशानुसार आणि शहराध्यक्ष आदरणीय अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाने,काम करत असत्ताना शहरात बंद असलेले आणि ब्लिंकर झालेल वाहतूक दिवे त्वरित चालू करावेत तसेच पादचाऱ्यांना त्यांचा हक्काचा वेळ वाढवून दयावा, 10 सेकंद ऐवजी ज्या सिग्नल च्या जवळ शाळा,आहेत त्या ठिकाणी महिला आणि मुलांचा विचार करुण तो 25 सेकंदाचा करावा, तसेच जेष्ठ नागरिकांचा विचार करुण काही ठिकाण चा वेळ 15,ते 20 सेकंड करावा.
अति उत्साही...