राष्ट्रवादी पक्षाच्या मोर्चांमुळे भाजपच्या मनात धडकी – युवक शहराध्यक्ष इम्रान शेख
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात काढलेल्या मोर्चांमुळे भाजपच्या मनात धडकी भरली आहे. त्यांच्या पायाखालची माती सरकली असून घाबरलेल्या या भाजपचे पतन व्हायला सुरूवात झाली आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी येथे व्यक्त केले.
भाजप सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शनिवारी (ता. २) संत तुकाराम नगर येथील पेट्रोल पंपावर निषेध सभा राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित केली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी (३०) राष्ट्रवादी युवक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना शेख बोलत होते.
राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे व सुरज चव्हाण, खासदार अमोल ...










