युवकांनी आपल्यातील असीम क्षमता ओळखावी – डॉ. वंदना महाजनी
यशस्वी संस्थेच्या आयआयएमएस तर्फे राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा
पिंपरी, ता. १२ जानेवारी : युवकांनी आपल्यातील असीम क्षमता वेळीच ओळखावी आणि स्वतःचे दैदिप्यमान भविष्य घडविण्यासाठी कायम स्वयंप्रेरित राहा असे मत स्वामी विवेकानंद केंद्राच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या समन्वयक डॉ.वंदना महाजनी यांनी व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद जयंती दिनी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने आयोजित ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रातील विविध घटनांचे दाखले देत त्या प्रसंगातून आपल्याला काय शिकवण मिळते हे सांगितले. युवापिढीने आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मकता, क्रियाशीलता व महत्वाकांक्षा या गुणांची ...










