पिंपरी चिंचवड

शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अरूण चाबुकस्वार यांचा सन्मान
शैक्षणिक, पिंपरी चिंचवड

शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अरूण चाबुकस्वार यांचा सन्मान

पिंपरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल न्यु सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक अरूण चाबुकस्वार यांचाही सन्मान करण्यात आला. महापौर उषा (माई) ढोरे, उपमहापौर हिराबाई (नानी) घुले, नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेविका सुनीता तापकीर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन चाबुकस्वार यांना सन्मानित करण्यात आले. ...
रावेतमध्ये स्वातंत्र्यदिन अनोख्या पध्दतीने साजरा
पिंपरी चिंचवड

रावेतमध्ये स्वातंत्र्यदिन अनोख्या पध्दतीने साजरा

रावेत : 'मिशन - ये नया रावेत है' टीमचे सदस्य आणि रावेत मधील स्थानिक पर्यावरण प्रेमी यांनी एकत्रित येऊन मानवी साखळीचे प्रदर्शन केले. मिशन ये नया रावेत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका 'ब' प्रभाग यांनी पर्यावरण युक्त सुविचार तसेच बॅनर तयार केले. अनेक सदस्यांनी तसेच त्यांच्या मुलांनी पर्यावरण विषयक घोषवाक्ये लिहून परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरण आणि स्वच्छतेविषयक जनजागृती निर्माण केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भास्कर गोखले, मनसे युवानेते प्रविण माळी, 'ब' प्रभाग प्रमुख सोनम देशमुख, आरोग्य अधिकारी शिंदे सर, गेंगजे सर, सुरज सर शिंगाडे सर, तुपे तसेच स्वछता कर्मचारी वर्ग आणि बेलाजिओ, हिलटॉपचे शिंदे सर व जेष्ठ नागरिक, सिरीन स्केप, मिटटाऊनमधील रहिवासी उपस्थित होते....
काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ध्वजारोहण
पिंपरी चिंचवड

काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ध्वजारोहण

काळेवाडी : स्वातंत्र्यदिनानिमित्त काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे यांचे हस्ते संघ कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी उपाध्यक्ष सुखदेव खेडकर, महिला उपाध्यक्ष शुभांगी देसाई, सह खजिनदार गंगाधर घाडगे, सह सचिव सुरेश विटकर, संघाचे पदाधिकारी व संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
महापालिकेतर्फे नवी सांगवीत प्लास्टिक मुक्त अभियान|१५ हजार रूपयांची केली दंडात्मक कारवाई
पिंपरी चिंचवड

महापालिकेतर्फे नवी सांगवीत प्लास्टिक मुक्त अभियान|१५ हजार रूपयांची केली दंडात्मक कारवाई

नवी सांगवी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत अभियानांतर्गत नो टू सिंगल युज ऑफ प्लास्टिक अभियान प्रभाग क्रमांक ३१, नवी सांगवी मध्ये घेण्यात आले. साई चौक येथील मंडई परिसरामध्ये व्यवसायिकांना व नागरिकांना अवैध प्लास्टिकचा वापर न करणेबाबत आवाहन करण्यात आले. त्यावेळी बरेच नागरिक प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करत असल्याचे दिसून आले. तसेच “नको दंड नको ना शिक्षा, प्लास्टिक मुक्त पिंपरी-चिंचवड शहर हीच अपेक्षा” या बोधवाक्य चा पाढा वाचत आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी आरोग्य निरीक्षक यांनी प्रभागातील सर्व भाजी विक्रेते, मटन मासोळी व्यावसायिक यांच्याकडून अवैध प्लास्टिकचा वापर न करणे बाबत सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. सर्व व्यावसायिकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला. ह क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक आढाव, आरोग्य निरीक्...
महेश प्रोफेशनल फोरमच्या पुढाकाराने आणि निसर्गराजा मैत्र जीवांचे व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण व गोसेवेचा कार्यक्रम संपन्न
पिंपरी चिंचवड, सामाजिक

महेश प्रोफेशनल फोरमच्या पुढाकाराने आणि निसर्गराजा मैत्र जीवांचे व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण व गोसेवेचा कार्यक्रम संपन्न

पिंपरी : महेश प्रोफेशनल फोरमच्या जॉय ऑफ लाईफ या कार्यक्रमा अंतर्गत, महानगरपालिका व निसर्गराजा मैत्र जीवांचे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षरोपण व गो-खाद्य रूपाने गोसेवा हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमा अंतर्गत पिंपरी चिंचवड महनगरपालिकेचे वरिष्ठ अभियंता प्रवीण लडकत यांनी महपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राची यथोचित माहिती दिली आणि पाणी वाचवण्याचे आवाहन केले. स्लाईड शो सहित प्रत्यक्ष शुध्दीकरण केंद्र बघितल्यावर उपस्थितांचा महापालिकेबद्दलचा आदर द्विगुणित झाला. उपिस्थितांनी उत्स्फूर्तपणे पाणी वाचवण्याची शपथ घेतली. जल शुध्दीकरण केंद्राची सफर मनीषा हींगणे यांनी घडवली. "हे काम माझ्या एकट्याचे नसून पूर्ण माझ्या पूर्ण टीमचे कार्य आहे, आम्हास आलेल्या यशास टीमचे मोलाचे सहकार्य आहे." असे मनोगत प्रवीण लडकत यांनी व्यक्त केले. "जलशुध्दीकरण केंद्राच्या कार्याने आम्ही भारावून गेलो." अस...
आकुर्डीमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पिंपरी चिंचवड

आकुर्डीमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आकुर्डी : येथील आम आदमी पार्टीचे युवाध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांच्या कार्यालयात विनायक सुबेदार चव्हाण व योगेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पिंपरी चिंचवड शहरातील ई. १० वी , १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आप पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी अनुप शर्मा, स्मिता पवार, किशोर जगताप, वैजनाथ शिरसाठ, वहाब शेख, यशवंत कांबळे.आकुर्डी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित शितोळे, आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ पाठक आणि सुभाष चौधरी यांनी केले....
दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचे समर्पण
पिंपरी चिंचवड

दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचे समर्पण

पिंपरी : पिंपरी चौकात गेल्या वर्षी मानवता हिताय व कामगार बांधकाम सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला 1 वर्ष पुर्ण झाले असून, बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक दिवंगत जयंत शिंदे यांच्या स्मरणार्थ सर्व वृक्षे त्यांना समर्पित करण्यात आली. तसेच फलकाचे उद्घाटन त्यांच्या पत्नी श्रीमती आशा जयंत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्षा माधवी जयंत शिंदे, उपाध्यक्ष सतीश भांडेकर, कार्याध्यक्ष दिपक म्हेत्रे, मानवता हितायचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी, उपाध्यक्ष विशाल कोळी यांच्या संकल्पनेतुन हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ऍड. सुशील मंचरकर, नेते व सामाजिक कार्यकर्ते अजीज शेख, प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, नितुल पवार, गणेश आहेर, चंद्रकांत बोचकुरे, राहुल विटकर, अजय (बाबा) कांबळे, अजय धोत्रे, अतुल धोत्रे आदी उपस्थित होते. ...
काळेवाडीतील श्री राधाकृष्ण मंदिरात ध्वजारोहण
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील श्री राधाकृष्ण मंदिरात ध्वजारोहण

काळेवाडी : स्वातंत्र्यदिनानिमित्त काळेवाडी येथील श्री राधाकृष्ण मंदिर परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी देशभक्तीपर गाण्यांनी परिसर दणाणून गेला होता. त्याप्रसंगी भागवत बाबा, बलबहादुर दमाई, अंबूकला दमाई, पुरन दमाई, लल्लू बोराटे, भोलेराधेश्याम, धनेश्वर, अशोक झा, रिंकू झा, नीरा बिरादर, मुस्कान, विजय यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ...
धर्मनिरपेक्षतेचा वारसा जपणाऱ्या बोपखेलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड

धर्मनिरपेक्षतेचा वारसा जपणाऱ्या बोपखेलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

बोपखेल : स्वातंत्र दिनानिमित्त बोपखेलमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक पहायला मिळाले. विविधतेने नटलेला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा जपणारे देशातील सर्व जाती धर्मचे व पंथाचे लोक गेली अनेक वर्षे येथे गुण्यागोविंदाने राहतात. धर्मनिरपेक्षतेचा वारसा जपणाऱ्या या गावात ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाग्यदेव घुले, अॅड. मुजिब सय्यद, नागुर साहेब, संतोष गायकवाड, नामदेव घुले, रोहीदास जोशी, दत्ता घुले, दत्तात्रय बाळु घुले व नागरिक व मुले उपस्थित होते. भाग्यदेव घुले म्हणाले, सर्व राज्यातील लोकांचे सण तेवढेच आनंदाने बोपखेलमध्ये साजरी होतात, हेच वेगळेपण आहे. सर्व धर्मांचा आदर करणे हेच आमची संस्कृती आहे. ...
डॉ. गुंजकार व साईराज देशमुख यांचा कोव्हीड योध्दा म्हणून गौरव
पिंपरी चिंचवड

डॉ. गुंजकार व साईराज देशमुख यांचा कोव्हीड योध्दा म्हणून गौरव

पिंपरी : स्वातंत्र्यदिनी गणेश इंटरनॅशनल स्कुलतर्फे डॉ. गुंजकार व साईराज ग्रुपचे संचालक साईराज देशमुख यांना आपत्कालीन परिस्थितीत उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल शाल, श्रीफळ, ट्रॉफी व कोव्हीड योध्दा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. गुंजकरांचे यांचे चिखली येथे हॉस्पिटल आहे. त्यामाध्यमातून त्यांनी लोकांची सेवा केली. तर साईराज देशमुख यांनी रुग्णवाहिकेमार्फत २४ तास लोकांची सेवा केली. त्यांच्या या चांगल्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला....

Actions

Selected media actions