दीडशे फूट लांबूनच घेतले अंत्यदर्शन; कर्मचाऱ्यांनी अपुऱ्या सुरक्षा साधनात केले अंत्यसंस्कार
पिंपरी : घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुडीला कवटाळून धाय मोकलून रडताना आपण अनेकदा पाहिले आहे. मात्र करोनाच्या या संकटामुळे रक्ताची नाती दुरावत असल्याचेही आता पहायला मिळत आहे. पुण्यातील एका करोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास नकार दिला. मुलगा आणि भाऊ फक्त या दोघांनीच दीडशे फूट लांबून अंत्यदर्शन घेतले. मृतदेहावर अंत्यसंस्काराची वाट न पाहता स्मशानभूमीतून काढता पाय घेतला. अखेर वायसीएममधील कर्मचाऱ्यांनी जीवावर होऊन कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध नसताना अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना हा साथीचा आजार आहे. या आजाराने मृत्यू झाल्यावर मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून नातेवाईकांच्या ताब्यात देतात. महापालिका कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. ...










