पिंपरी चिंचवड

Covid-19 : पिंपरी चिंचवडमधील या भागात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण 
पिंपरी चिंचवड

Covid-19 : पिंपरी चिंचवडमधील या भागात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण

पिंपरी, ता. 16 (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय कोरोनाचे किती रुग्ण आहेत. याची आकडेवारी असलेला नकाशा प्रसारित केला आहे. त्यामध्ये ई क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत सर्वात जास्त कोरोना बाधित रूग्ण असल्याचे दिसत आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात आजपर्यंत एकुण 48 कोरोना विषाणू सकारात्मक रूग्ण सापडले असून त्यापैकी 12 रूग्ण उपचारानंतर कोरोना मुक्त झाले आहेत. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली. ही आहेत आठ क्षेत्रीय कार्यालये अ प्रभाग (रूग्ण संख्या - ०१) प्रभाग क्रमांक १० (संभाजीनगर), प्रभाग क्रमांक १४ (मोहननगर, आकुर्डी), प्रभाग क्रमांक १५ (प्राधिकरण) आणि प्रभाग क्रमांक १९(आनंदनगर, भाटनगर). ब प्रभाग (रूग्ण संख्या - ००) प्रभागातील परिसर प्रभाग क्रमांक १...
Lockdown : अत्यावश्यक कारणास्तव इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची सुविधा
पिंपरी चिंचवड

Lockdown : अत्यावश्यक कारणास्तव इतर जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची सुविधा

पिंपरी (लोकमराठी) : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 3 मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे अनेक नागरिक आहे त्या ठिकाणीच अडकलेले आहेत. मात्र आता पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या काळात वैद्यकीय अथवा मृत्यू किंवा अन्य अत्यावश्यक आपत्कालीन कारणास्तव पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतू राज्यातील अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास ची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे ज्यांना खरच गरज आहे अशा व्यक्तींना आता इच्छित ठिकाणी जाता येणार आहे. मात्र, हा ई-पास केवळ अत्यावश्यक सेवेसाठी असणार आहे असं नमूद करण्यात आलं आहे. https://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर जाऊन आवश्यक असलेली कागदपत्र आणि फोटो अपलोड करून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून यामुळे शहरातील एकाचा मृत्यू देखील झाला आहे...
Covid-19 : करोना बाधित अंडी विक्रेत्यामुळे १८० जणांचं विलगीकरण
पिंपरी चिंचवड

Covid-19 : करोना बाधित अंडी विक्रेत्यामुळे १८० जणांचं विलगीकरण

पिंपरी (लोकमराठी) : भोसरीत राहणाऱ्या व इतर ठिकाणी अंड्यांचा पुरवठा करणाऱ्या एका अंडी विक्रेत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या परिसरातील १८० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. भोसरी येथील राहणारा हा विक्रेता महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत आहे. तो किरकोळ विक्रेत्यांना अंड्यांचा पुरवठा करायचा. पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या करोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे दररोज नवे रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, भोसरी परिसरातील एका अंडी विक्रेत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झाले असून तो इतर ठिकाणी अंड्यांचा पुरवठा करत होता. यामुळे वेगवेगळ्या भागातील ऐकून १८० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं असल्याची माहिती डॉ. कनकवले यांनी दिली आहे. यात किरकोळ विक्रेते आणि नागरिकांचा समावेश आहे. परिसरातील नानेकरवाडी, खराबवाडी आणि मेंदनक...
Covid-19 : पिंपरी चिंचवडमधील कोरोना रुग्णांची क्षेत्रीय कार्यालयानिहाय माहिती
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Covid-19 : पिंपरी चिंचवडमधील कोरोना रुग्णांची क्षेत्रीय कार्यालयानिहाय माहिती

पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय कोरोनाचे किती रुग्ण आहेत. याची आकडेवारी असलेला नकाशा प्रसारित केला आहे. त्या नकाशावर बुधवारपर्यतची रूग्णांची आकडेवारी दिली आहे. ही आहेत आठ क्षेत्रीय कार्यालये अ प्रभाग (रूग्ण संख्या - ०१) प्रभाग क्रमांक १० (संभाजीनगर), प्रभाग क्रमांक १४ (मोहननगर, आकुर्डी), प्रभाग क्रमांक १५ (प्राधिकरण) आणि प्रभाग क्रमांक १९(आनंदनगर, भाटनगर). ब प्रभाग (रूग्ण संख्या - ०) प्रभागातील परिसर प्रभाग क्रमांक १६ (रावेत), प्रभाग क्रमांक १७ (बिजलीनगर, चिंचवडेनगर), प्रभाग क्रमांक १८ (चिंचवड) आणि प्रभाग क्रमांक २२(काळेवाडी). क प्रभाग (रूग्ण संख्या - ०८) प्रभाग क्रमांक २ (बोऱ्हाडेवाडी), प्रभाग क्रमांक ६ (धावडेवस्ती), प्रभाग क्रमांक ८ (इंद्रायणीनगर) आणि प्रभाग क्रमांक ९ (नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा). ड प्रभाग (रूग्ण संख्या - ०) प्रभाग...
पिंपरी भाजीमंडईत पुन्हा मोठी गर्दी; पोलिसांकडून लाठीमार
पिंपरी चिंचवड

पिंपरी भाजीमंडईत पुन्हा मोठी गर्दी; पोलिसांकडून लाठीमार

पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी बाजारपेठेतील मुख्य भाजीमंडई सुरू करण्याविषयी महापालिकेने काढलेले परिपत्रक, त्यानंतर काढलेला सुधारित आदेश यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामुळे बुधवारी भल्या सकाळी पंचक्रोशीतील भाजीविक्रेत्यांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी उसळली. मंडईत पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली. नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. बाजारपेठेतील भाजीमंडई काही दिवसांपूर्वी महापालिकेने बंद केली होती. सर्वच स्तरातून दबाव आल्याने मंडई पुन्हा सुरू करण्यात आली. तेव्हा मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली म्हणून दोन तासांत मंडई बंद करण्याची नामुष्की ओढावली होती. गेल्या आठवडय़ातील ही घटना ताजी असताना बुधवारी सकाळी त्याची पुनरावृत्ती झाली. महापालिकेच्या कारभारातील समन्वयाचा अभाव हे त्यास कारण ठरले. महापालिकेने मंगळवारी दुपारी काढलेल्या पहिल्या आदेशानुसार, बुधव...
Lockdown: सांगवीत पोलिसांचा रुट मार्च; नागरिकांनी टाळ्या वाजवून केले स्वागत
पिंपरी चिंचवड

Lockdown: सांगवीत पोलिसांचा रुट मार्च; नागरिकांनी टाळ्या वाजवून केले स्वागत

पिंपरी (लोकमराठी) : सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी लोकांनी घराबाहेर पडू नये हा संदेश देण्यासाठी रूट मार्च काढला. यावेळी ज्या भागातून हा रुट मार्च गेला तिथल्या लोकांनी घरातून पोलिसांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिलं. दरम्यान, करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये पुन्हा ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, करोनाच्या विरोधात लढण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी चोख भूमिका बजावत आहेत. रस्त्यावर उतरून पोलीस आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. करोना विषाणूचा फैलाव सुरुच असून भारतात अनेकांचा आपला जीव गमवाव लागला आहे. वारंवार नागरिकांना आवाहन करूनही ते घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करीत अनेकांना काठीचा प्रसादही दिला होता. या कारवाईमुळं लोकांचं घराबाहेर पडणं काहीसं कमी झालं. ज्या भागात पोलिसांनी घराबाहेर पडणाऱ्यांना काठ्यांचा प्रस...
Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना व्हायरसमुळे ४७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू, शहरातील पहिला बळी
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना व्हायरसमुळे ४७ वर्षीय रुग्णाचा मृत्यू, शहरातील पहिला बळी

संग्रहित छायाचित्र लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी (पुणे), ता. १२ : पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या एका ४७ वर्षाच्या पुरूषाचा उपचारादरम्यान रविवारी (ता. 12) मृत्यू झाला. कोरोना विषाणूमुळे हा पहिलाच बळी असून मृत व्यक्ती सुरक्षारक्षकाचे काम करत होता. मृत्यू झालेल्या या व्यक्तीला त्रास होऊ लागल्यामुळे पाच दिवसांपूर्वी तो चिंचवड येथील महापालिकेच्या एका दवाखान्यात गेला होता. त्याला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याच्या घशाचे द्रव्य घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ९ एप्रिल रोजी तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारादरम्यान त्याची प्रकृती खालावल्याने अखेर रविवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्याच्या संपर्कात आलेल्या आठ जणांच्या घशाचे द्रव्य तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत...
Covid-19 : डॉ.डी.वाय. पाटिल A.C.S व LAW कॉलेज तर्फे पोलीसांना मास्क व सैनिटाइजरचे वाटप
पिंपरी चिंचवड

Covid-19 : डॉ.डी.वाय. पाटिल A.C.S व LAW कॉलेज तर्फे पोलीसांना मास्क व सैनिटाइजरचे वाटप

 पिंपरी (लोकमराठी) : आपल्या जीवाची बाजी लाउन रात्र दिवस देशसेवा करुण, कोरोना ला हद्दपार करण्यासाठी स्वताचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोना पासून बचाव होन्यासाठी, आपले छोटेसे कर्तव्य म्हणून पिंपरी मधील डॉ डी वाय पाटिल A.C.S व LAW कॉलेज ने पिंपरी येतील सर्व पोलिस कर्मचारी तसेच संत तुकाराम नगर पोलिस चौकीतिल सर्व अधिकारी कर्मचार्यांना मास्क व सैनिटाइजर चे वाटप करण्यात आले. त्यावेळी डॉ डी वाय पाटिल कॉलेजचे HOD डॉ किशोर निकम, मंगेश नढे व अन्य स्टाफ व विद्यार्थि उपस्थित होते....
Lockdown : दापोडी, कासारवाडी परिसर ‘सील’
पिंपरी चिंचवड

Lockdown : दापोडी, कासारवाडी परिसर ‘सील’

पिंपरी-चिंचवड (लोकमराठी) : पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा विळखा वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शनिवारी (११ एप्रिल) रात्री ११ वाजल्यापासून दापोडी, कासारवाडी परिसर सील करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा भाग 'सील' असणार आहे. तसेच शुक्रवारपासून (१० एप्रिल) भोसरीतील काही भागही सील केला आहे. पाच दिवसांपूर्वी खराळवाडी, दिघी, चिखली, थेरगाव परिसर सील केला आहे. शनिवारपर्यंत पिंपरी-चिंचवडमधील सात भाग 'सील' केले आहेत. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा भाग 'सील' केला आहे. सील करण्यात आलेला परिसर विनियर्ड चर्च परिसर, दापोडी (माता शितळादेवी चौक - व...
Coronavirus: पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाबाधित व्यक्तीचा पोलीस ठाण्यात संचार
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Coronavirus: पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाबाधित व्यक्तीचा पोलीस ठाण्यात संचार

पुणे (लोकमराठी) : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस ठाण्यात कोरोनाबाधित व्यक्तीने मुक्त संचार केल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाणे निर्जंतुक करण्यात आले असून योग्य ती काळजी घेतली जात आहे. मात्र, त्यावेळी करोनाबाधित असल्याचे संबंधित व्यक्तीलाही माहिती नसल्याने नकळत तो पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. तीनच दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केलेला रुग्ण हा करनोबाधित आढळला होता. त्यानंतर तेथील डॉक्टरांसह ऐकून ९२ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. सुदैवाने सर्वांचे निगेटिव्ह रिपोर्ट आले होते. त्या घटनेनंतर शहरात ही गंभीर बाब उघड झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या २४ तासांत दोन करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यांपैकी, एका रुग्णाचे पिंपरी-चिंचवड शहरात चिकनचे दुकान आहे. हीच व्यक्ती आपलं दुकान सुरु ठेवण्याबाबत परवानगी घेण्यासाठी एका पोलीस ठाण्यात ग...