मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे- डॉ. श्रीपाल सबनीस
पिंपरी : भाषा हे संस्कृती वहनाचे साधन आहे. मराठी भाषेला प्राचीन इतिहास आहे. ७ व्या व ८ व्या शतकापासून मराठी भाषेत लोकसाहित्य निर्मिती होत आली आहे. १२ व्या शतकात संत ज्ञानेश्वरांपासून नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्यापासून कुसुमाग्रज, वि. दा. करंदीकर, शांता शेळके, बाबुराव बाबूल, दया पवार ते भालचंद्र पर्यंतचे साहित्यिक मराठीत झाले आहे. जगाच्या पाठीवर अधिक बोलली जाणारी ही १० व्या क्रमांकाची भाषा आहे. संत साहित्याने मानवी जीवन चिंतामुक्त करून सुखी बनविण्याचा मार्ग सांगितला महात्मा फुले, महर्षी शिंदे, टिळक, आगरकर, आंबेडकर यांच्या लेखणीने मराठीला आधुनिक विचारांनी समृद्ध केले. ज्ञानेश्वरीतील पसायदानाची UNO ने दाखल घेतली आशा या प्राचीन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. असे विचार अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या मह...










