पिंपरी चिंचवड

बोगस प्रमाणपत्र प्रकरणातील महापालिकेच्या 28 लिपिकांची खातेनिहाय चाैकशी
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

बोगस प्रमाणपत्र प्रकरणातील महापालिकेच्या 28 लिपिकांची खातेनिहाय चाैकशी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चर्तुर्थ श्रेणी वर्गातून लिपिक पदावर पदोन्नती मिळविलेल्या कर्मचा-यांनी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यामुळे 117 कर्मचा-यांपैकी 28 लिपिकांची पदोन्नती रद्द करण्यात आली. त्या कर्मचा-यांचे वर्ग ड चतुर्थश्रेणी पदावर पदावतन करुन खातेनिहाय चाैकशीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचा-यांची अपुरी संख्या, शासन दरबारी लालफितीत अडकलेल्या आकृतीबंधामुळे प्रशासनाला कर्मचा-यांची कमरतता जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने मंजूर पदावर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार लिपिक पदावर पदोन्नती दिली. महापालिका आस्थापनेवरील वर्ग 4 मधील सुमारे 117 कर्मचा-यांना वर्ग 3 मधील लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय प्रशासनाने काही दिवसापुर्वी घेतला. त्याचा लाभ सुमारे 117 कर्मचा-यांना झाला. ...
युतीतले पक्ष म्हणजे राजकीय क्षेत्राला कलंक – अजित पवार
पिंपरी चिंचवड

युतीतले पक्ष म्हणजे राजकीय क्षेत्राला कलंक – अजित पवार

पिंपरी : युतीने केंद्रात राज्यात पाच वर्षे सत्ता राबविली तरी त्यांना लोकसभेला उमेदवार मिळेनात. म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून उमेदवार घेत आहेत. युतीतील पक्ष म्हणजे राजकीय क्षेत्राला लागलेला कलंक आहे अशी टिका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. शुक्रवारी (दि. 29 मार्च) अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑटो क्लस्टर चिंचवड येथे मावळ व भोसरी लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहर कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले की, आता देशात वातावरण बदलले आहे. भाजपाच्या व युतीच्या कारभाराला जनता कंटाळलेली आहे. शेतक-यांना कर्ज माफी दिली नाही. रोजगारात वाढ होण्याएैवजी कमी होत आहेत. शेतकरी आत्म...
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लढणार भाजपच्या गोपाळ शेट्टीच्या विरोधात
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लढणार भाजपच्या गोपाळ शेट्टीच्या विरोधात

मुंबई ( दि. २९) - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे तगडे उमेदवार आव्हान परतवून लावण्यासाठी काँगेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. आज, शुक्रवारी अखिल भारतीय काँगेस कमिटीने दिल्लीतून याची घोषणा केली. उत्तर मुंबईतून पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रविण छेडा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू होते. मात्र छेडा यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला. यामुळे निवडणुकीत चमत्कार घडवेल अशा उमेद्वाराच्या शोधत काँग्रेसचे नेते होते. निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र त्यांचा फारसा प्रभाव नसल्याने तीनच दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. उत...
मावळ लोकसभा निवडणूक प्रशासनात ‘ महिलाराज ’
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र

मावळ लोकसभा निवडणूक प्रशासनात ‘ महिलाराज ’

लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या मावळ लोकसभा निवडणुकीत महिलाराज दिसून येत आहे. प्रशासकीय आणि संबंधित विभागातील मूळ जबाबदारी सांभाळून महिला अधिकारी सक्षमपणे निवडणुकीचे अतिरिक्त कामकाज सांभाळत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी कविता द्विवेदी यांची नियुक्ती झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी पदासह विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. सन २०१७ पासून पीएमआरडीएत त्या कार्यरत आहेत. विविध निवडणुकींसाठीही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे मावळ मतदारसंघाची मुख्य जबाबदारी आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात हा मतदारसंघ विभागल...
मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देणे ही खरी गोळीबारातील शहिदांना खरी श्रद्धांजली – विजय शिवतारे
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र

मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देणे ही खरी गोळीबारातील शहिदांना खरी श्रद्धांजली – विजय शिवतारे

खासदार बारणे यांच्या मावळ तालुक्यातील प्रचाराचा विजय शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ पिंपरी, 29 मार्च – बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देता गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना खरी श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवारी) वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार बारणे यांच्या प्रचाराचा शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या तथा शिवसेना भाजपा युतीच्या समन्वयक आमदार डॉ. नीलम गो-हे, मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी उपनराध्यक्ष...