मोबाईल व सोशल मिडीयाचा मर्यादित वापर करावा – वैशाली माने
स्वकृता चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमात वैशाली माने यांचा गौरव करताना अश्विनी पटवर्धन, मनाली गाडगीळ, मनाली देव.
स्वकृता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महिलादिन साजरा
पिंपरी : स्त्रीयांनी कोणत्याही क्षेत्रात वावरताना सावधगिरी बाळगावी व आपली वैयक्तीक माहिती कारणाशिवाय कोठेही प्रस्तूत करु नये. मोबाईल व सोशल मिडीयाचा मर्यादित वापर करावा. सोशल मिडीयामध्ये खाजगी फोटो, वैयक्तीक माहिती, बँक खात्यातील माहिती देऊ नये. आपले संरक्षण करण्यात आपणच पुढाकार घ्यावा. पोलीस, प्रशासनाची भूमिका मुख्यत्वे गुन्हा घडल्यानंतर असते. परंतू गुन्हा घडू नये यासाठी सर्वांनी जागृत राहुन सावधानता बाळगावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैशाली माने यांनी दिली.
जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवड येथे ‘स्वकृता चॅरिटेबल ट्रस्टच्या’ वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वैशाली माने, योग प्रशिक्षक मनाली घारपुरे - देव यांच्या ट...









