पिंपरी चिंचवड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी
पिंपरी चिंचवड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी

रहाटणी : येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका आसावरी घोडके, पुरुषोत्तम गाणार (सामाजिक कार्यकर्ते ), माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.पुरुषोत्तम गाणार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर बुध्द वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूवर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी खाऊ वाटप करण्यात आला. “प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असून त्याला स्वत:ला एक अस्मिता आहे. याची जाणीव प्रत्येका...
महात्मा ज्योतिबा फुले यांना आपच्या वतीने अभिवादन
पिंपरी चिंचवड

महात्मा ज्योतिबा फुले यांना आपच्या वतीने अभिवादन

पिंपरी : आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी आम आदमी पार्टीचे अशोक तनपुरे, डॉ. अमर डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर फुले, सुभाष माच्छरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी बोलतांना आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट म्हनाले की, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते. असे म्हणणाऱ्या ज्योतीबांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्या बरो...
रहाटणीत ‘शासन आपल्या दारी’ व महाआरोग्य शिबिराचा १५०० नागरिकांनी घेतला लाभ
पिंपरी चिंचवड

रहाटणीत ‘शासन आपल्या दारी’ व महाआरोग्य शिबिराचा १५०० नागरिकांनी घेतला लाभ

पिंपरी : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन व पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासन आपल्या दारी हा उपक्रम गुरूवारी रहाटणीतील विमल गार्डन येथे संपन्न झाला. रहाटणी, काळेवाडी, थेरगाव परिसरातील नागरिक, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शासकीय दाखले यावेळी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे १५०० नागरिकांनी लाभ घेतला. यामध्ये उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड नोंदणी व दुरूस्ती, नॉनक्रिमीलीअर दाखला, संजय गांधी निराधार योजनेतील विविध दाखले, श्रावण बाळ योजनेतील विविध दाखले तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग कार्यालय निगडी यांच्या वतीने नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका, नावे कमी करणे, विभक्त शिधापत्रिका, रास्तभाव दुकान बदलणे, पत्ता बदलणे आदी शिधापत्रिकेतील बदल नागरिकांनी यावेळी केले....
आपच्या वतीने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ विरोधात निगडीत निषेध आंदोलन
पिंपरी चिंचवड

आपच्या वतीने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ विरोधात निगडीत निषेध आंदोलन

पिंपरी : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढ विरोधात आज निगडी उड्डाणपूल खाली लोकमान्य टिळक पुतळ्या जवळ वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. गेल्या एक वर्षात कोरोना महामारीमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या,उद्योग धंदे बंद पडले, कर्ज वाढला. अश्या या संकट समयी राज्य व केंद्र सरकारची प्राथमिकता लोकांला नोकऱ्या मिळवुन द्यायचे, उद्योग धंदे पुनर्वसन करण्याचे असले पाहिजे तर पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून जनते वर अतिरिक्त भार टाकत आहे. जो पर्यंत पेट्रोल, डिझेल चे दर केंद्र सरकार कमी करत नाही तो पर्यंत आम आदमी पार्टी महागाई च्या विरोधात आंदोलन करत राहणार असे आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अनुप शर्मा यांनी बोलताना सांगितल. मोदी सरकारला सत्तेची मस्ती आहे त्यामुळे त्यांना सामान्य जनतेचा आवाज ऐकू येत नाही. जनता मेटाकुटीला आलेली आहे. अनेक...
पंकज पवार यांच्या संकल्पनेतून संत नगर सेक्टर चारमध्ये आठवडी बाजार सुरू
पिंपरी चिंचवड

पंकज पवार यांच्या संकल्पनेतून संत नगर सेक्टर चारमध्ये आठवडी बाजार सुरू

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क मोशी : मोशी प्राधिकरण मधील संत नगर सेक्टर क्रमांक ४ येथील नागरिकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी होत असलेली अडचण पाहून त्या ठिकाणी एक आठवडी बाजार सुरू करण्याची संकल्पना येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज पवार यांना सुचली आणि म्हणून येथील नागरिकांच्या सोयीसाठी त्यांनी येथे आठवडी बाजार सुरू करण्याचे ठरवले. संघर्ष संस्था प्रतिष्ठान संस्थापक पंकज पवार आणि वरद विनायक फार्मसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने "शेतकरी ते थेट ग्राहक" या योजनेअंतर्गत आठवडे बाजार सुरू करण्याचं ठरवलं. दिनांक 07 एप्रिल 2022 रोजी संत नगर सेक्टर नंबर 4 मोशी प्राधिकरण श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी आठवडे बाजार चालू करण्यात आला. संत नगर सेक्टर 4 व 6, गंधर्व नगरी, जय गणेश साम्राज्य या ठिकाणावरील नागरिक, महिला या आठवडी बाजाराचा फायदा होणार आहे. आणि परिसरातील सर्व महिला भगिनींना...
भाजप नेते शंकरशेठ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान व श्री स्वामी समर्थ मंदिरास सीसीटीव्ही कॅमेरे भेट
पिंपरी चिंचवड

भाजप नेते शंकरशेठ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान व श्री स्वामी समर्थ मंदिरास सीसीटीव्ही कॅमेरे भेट

पिंपरी : भाजप नेते व माजी नगरसेवक शंकर शेठ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भटक्या विमुक्त जाती-जमाती सांगवी मंडल अध्यक्ष प्रकाश सुखलाल लोहार व सामाजिक कार्यकर्त्या भारती लोहार यांच्या वतीने अन्नदान व काळेवाडी ज्येष्ठ नागरिक संघांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विजयनगरमधील श्री स्वामी समर्थ मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे भेट देण्यात आले. काळेवाडी-विजयनगर येथील प्रकाश लोहार यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी माजी स्विकृत नगरसेवक विनोद तापकीर, भाजप उपशहराध्यक्ष धर्मा पवार, सप्तश्रृंगी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आर. डी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिलीप आंब्रे, शांताराम पाटील, रमेश काळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदमाकर जांभळे, उपाध्यक्ष सुखदेव खेडकर, शिवाजी पाटील, गणेश लोहार, अरविंद लोहार, बाळासाहेब पाटील, प्रदीप राणे, सामाजिक कार्यकर्त्या नंदा कापु...
खासगी पेट्रोल पंपांचा पुरवठा सुरळीत करा अन्यथा बेरोजगारी वाढेल : योगेश बाबर
पिंपरी चिंचवड

खासगी पेट्रोल पंपांचा पुरवठा सुरळीत करा अन्यथा बेरोजगारी वाढेल : योगेश बाबर

खासगी तेल कंपनी नयारा कडून विस्कळीत पुरवठ्यामुळे पेट्रोल पंप चालक संकटात रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर रोजच वाढत आहे. केंद्र सरकार रोज इंधन दर वाढवत आहे. परिणामी नयारा (एस्सार) कंपनी देशभरातील त्यांच्या डिलर्सला पुरवठा कमी करीत आहेत. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून राज्यातील या कंपनीचे ७०० पेट्रोल पंप बंद आहेत. या खासगी पेट्रोल पंपांचा पुरवठा केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन सुरळीत करावा अन्यथा या व्यवसायावर अवलंबून असणा-या १ लाखापेक्षा जास्त नागरीकांना रोजगार गमवावा लागेल असे प्रतिपादन महापेट्रो डिलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश बाबर यांनी केले. पिंपरी येथे मंगळवारी (दि. ५ एप्रिल) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्यभरातून आलेले पेट्रोल पंप डिलर्स उपस्थित होते. यामध्ये राजकुमार मोरे, रोहित जठाणी, आनंद मंगरुळे, महेश बुब, हेंमत वालेचा, रेपल श्रीधर, वरुण भु...
विशाल वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र रोग तपासणी शिबीर संपन्न
पिंपरी चिंचवड

विशाल वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र रोग तपासणी शिबीर संपन्न

पार्थ पवार आणि विशाल शंकर वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ३ दिवसीय नेत्र रोग तपासणी मोफत चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. वाकड परिसरातील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. म्हातोबा नगर, काळाखडक, वाकडकर वस्ती या तीन ठिकाणी आयोजित शिबिरात जवळपास अकराशे पेक्षा जास्त नागरिकांनी नेत्र तपासणी केली यामधील साडेसातशे नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर पंचेचाळीस रूग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया लवकरच या माध्यमातून होणार आहे. शिबिरामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. तज्ञ डॉक्टरांमार्फत उपस्थित शिबिरार्थींची नेत्र तपासणी करण्यात आली. नागरिकांनी नेत्र तपासणी बाबत जागरूक होणे आवश्यक आहे तसेच त्यांचे आरोग्य राहणीमाण उंचविण्याच्या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते, याचा लाभ नागरिकांनी घेतला याबाबत समाधान ...
तीन चाकी रिक्षावरील नवीन अन्यायकारक दंड रद्द न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन : बाबा कांबळे
पिंपरी चिंचवड

तीन चाकी रिक्षावरील नवीन अन्यायकारक दंड रद्द न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन : बाबा कांबळे

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे निवेदन तीन चाकी रिक्षांच्या तसेच सर्व प्रकारच्या वाहनास वाढीव शुल्कवाढ तसेच फिटनेस विलंबाचे जुजबी प्रतिदिन पन्नास रुपये दंड वसूली करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने नवीन न्यायकारक अध्यादेश काढला आहे. हा अन्यायकारक जुलमी दंड रद्द झालाच पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले. ऑटो रिक्षा हे पोट भरण्याचे साधन आहे. जुजबी व जुलमी दंड भरण्याचे माध्यम नव्हे. त्यामुळे केंद्र सरकारने नवीन लागू केलेला अद्यादेश ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने शिष्टमंडळाने बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोईर यांनी स्वतः आरटीओ च्या पायऱ्या वर बसलेल्या आंदोलकांची भेट घेऊन त्य...
पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना पिंपरी चिंचवड सन्मान जीवन गौरव पुरस्कार जाहिर न्यूज १४ मिडीया नेटवर्कचे “पिंपरी चिंचवड सन्मान” पुरस्काराचे जाहीर
पिंपरी चिंचवड

पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना पिंपरी चिंचवड सन्मान जीवन गौरव पुरस्कार जाहिर न्यूज १४ मिडीया नेटवर्कचे “पिंपरी चिंचवड सन्मान” पुरस्काराचे जाहीर

भोसरी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या पाच गावांचा समावेश असणारी पिंपरी चिंचवड नगरपालिका दिवंगत खासदार आण्णासाहेब मगर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. मागील ५० वर्षात गाव खेडे ते औद्योगिक नगरी, कामगार नगरी हा नावलौकिक अभिमानाने मिरविणा-या या शहराचे नाव आता जागतिक पातळीवर स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी, स्पोर्टस्‌ सिटी म्हणून पुढे येत आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात येथील भुमिपूत्रांसह उद्योग, व्यवसायानिमित्त देशभरातील विविध जिल्ह्यातून आलेल्या कामगारांचे व विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या नागरीकांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यातील निवडक मान्यवरांचा योग्य सन्मान ‘न्यूज १४ मिडीया नेटवर्क’च्या वतीने गुरुवारी (दि. ७ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता ऑटो क्लस्टर हॉल चिंचवड येथे करण्यात येणार आहे. पद्मश्री गिरीश प्रभूणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अख...