पिंपरी चिंचवड

प्रकाशाचा मार्ग दाखविणारी दिपमाळ मांगल्याचे प्रतीक : खा. डॉ. अमोल कोल्हेनगरसेविका वैशाली काळभोर यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या दिपमाळेचे उद्‌घाटन
पिंपरी चिंचवड

प्रकाशाचा मार्ग दाखविणारी दिपमाळ मांगल्याचे प्रतीक : खा. डॉ. अमोल कोल्हेनगरसेविका वैशाली काळभोर यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या दिपमाळेचे उद्‌घाटन

पिंपरी (दि. ११ मार्च २०२२) अंधारातून प्रकाशाचा मार्ग दाखविणारी दिपमाळ हि मांगल्याचे प्रतिक आहे. देहू ते पंढरपूर या भक्ती मार्गावर काळभोरनगर येथे उभारलेली हि दिपमाळ आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारी आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.गुरुवारी (दि. १० मार्च) चिंचवड काळभोर नगर येथे नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या संकल्पनेतून बालाजी चौक येथे उभारलेल्या दिपमाळेचे उद्‌घाटन खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक शंकरराव पांढरकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, नगरसेविका वैशाली काळभोर, मिनल यादव, पंकज भालेकर, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होत्या....
रहाटणीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व राजमाता जिजाऊ अभ्यासिकेचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र व राजमाता जिजाऊ अभ्यासिकेचे उद्घाटन

पिंपरी, ता. १२ मार्च : रहाटणी प्रभाग क्र. २८ येथे प्राधिकरण व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या ज्येष्ठासाठी विरंगुळा केंद्र व राजमाता जिजाऊ अभ्यासिकेचे उद्घाटन माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व राज्य लोकसेवा आणि केंद्रिय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी माजी स्वीकृत नगरसदस्य सागर खंडूशेठ कोकणे, ड क्षेत्रिय कार्यालयाचे प्रभाग अधिकारी विलास देसले, स्थापत्य विभागाचे उपअभियंता सुनिलदत्त नरोटे, कनिष्ठ अभियंता स्वप्निल शिर्के, विद्यार्थी विद्यार्थिनी व नागरिक उपस्थित होते. ही अभ्यासिका पिंपरी चिंचवड शहरातील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षा तसेच केंद्रिय लोकसेवा आयोग परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी विशेष सहकार्य लाभणार आहे. भविष्यातील राज्य व केंद...
रावेत जलउपसा केंद्राजवळील नदीपात्रात मृत जनावरे ; नागरीकांचे आरोग्य धोक्यात | थेरगाव सोशल फाऊंडेशनचा आंदोलनाचा ईशारा
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

रावेत जलउपसा केंद्राजवळील नदीपात्रात मृत जनावरे ; नागरीकांचे आरोग्य धोक्यात | थेरगाव सोशल फाऊंडेशनचा आंदोलनाचा ईशारा

पिंपरी, ता १२ : रावेत येथील महापालिका जलउपसा केंद्राजवळ गेल्या काही महीन्यांपासून नदीपत्रात वारंवार मेलेली जनावरे तसेच जनावरांची चरबी टाकण्याचे प्रकारे अनोळखी व्यक्तींकडून सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा थेरगाव सोशल फाऊंडेशनने दिला आहे. याबाबत फाउंडेशनच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी पवना नदीपात्रातून रोज करोडो लिटर पाणीउपसा केला जातो. त्यासाठी रावेत येथे पालिकेने जलउपसा केंद्र उभारले असून त्याठिकाणावरून पाणी उचलून त्यावर योग्य प्रक्रिया करून ते पाणी जलवाहिनीद्वारे नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. मात्र, गेल्या काही महीन्यांपासून या ऊपसाकेंद्राजवळ नदी...
रहाटणीत सिटीझन फर्स्ट सेवा केंद्राचा उत्साहात शुभारंभ; व्यावसायिक संकल्पासोबत मनोज कुमार बोरसे यांनी केला सामाजिक जबाबदारीचा निश्चय
पिंपरी चिंचवड

रहाटणीत सिटीझन फर्स्ट सेवा केंद्राचा उत्साहात शुभारंभ; व्यावसायिक संकल्पासोबत मनोज कुमार बोरसे यांनी केला सामाजिक जबाबदारीचा निश्चय

रहाटणी : सिटीझन फर्स्ट सेवा केंद्राचे उद्घाटन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व ब्राईट डेंटल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. अभिजित देशपांडे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सिटीजन फर्स्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना व व्यावसायिकांना विविध नागरी सेवा एकाच छताखाली मिळणार आहे. यामध्ये भारतातल्या विविध विमा कंपन्यांचे विमा उत्पादने जसे जीवन विमा, वाहन विमा, आरोग्य विमा, प्रवास विमा इत्यादी सर्व प्रकारच्या विमा सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. सिटीजन फर्स्टचे वैशिष्ट्य आहे की, नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार व क्षमतेनुसार विमा घेण्याचा पर्याय सिटीजन फर्स्ट सेवा केंद्र उपलब्ध करून देणार आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात विमा सेवा व्यतिरिक्त इतर सर्व सेवा प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या तीस दिवसांसाठी राबविण्यात येणार आहे. सदर उपक्रमांतर्गत लवकरच आपले सरकार सेवा केंद्र तसे...
कामायनीच्या विद्यार्थ्यांना स्थायी समितीने घडवली मेट्रो सफर
पिंपरी चिंचवड

कामायनीच्या विद्यार्थ्यांना स्थायी समितीने घडवली मेट्रो सफर

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरीतील मेट्रो प्रकल्पाचे रविवारी ऑनलाईन उद्‌घाटन झाले. तेंव्हापासून सर्व शहरवासियांमध्ये मेट्रोतून प्रवास करणे आकर्षण ठरत आहे. त्यामुळे कामायनी विद्यालयाच्या ‘विद्यार्थ्यांना स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी मोफत मेट्रो सफर घडवली. पिंपरी मेट्रो स्टेशन ते फुगेवाडी मेट्रो स्टेशन आणि परत असा विद्यार्थ्यांनी मेट्रो प्रवास केला. यावेळी पक्षनेते नामदेव ढाके व स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी कामायनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेली श्री गणेशाची प्रतिमा स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांना भेट देण्यात आली. मेट्रो प्रवासाचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेह-यावर ओसंडून वाहत होता....
पवार यांच्या जिल्ह्यात देखिल माथाडी कामगारांवर खंडणीचे गुन्हे दाखल : नरेंद्र पाटील
पुणे, पिंपरी चिंचवड

पवार यांच्या जिल्ह्यात देखिल माथाडी कामगारांवर खंडणीचे गुन्हे दाखल : नरेंद्र पाटील

राज्यातील माथाडींच्या प्रश्नांबाबत आता आझाद मैदानात आंदोलन : नरेंद्र पाटील पिंपरी, पुणे (दि. ११ मार्च २०२२) : उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सरकार मधिल मंत्री, पालकमंत्री आणि कामगार आयुक्त, पोलिस आयुक्त हे माथाडी कामगारांवर अन्याय करुन कंपनी व्यवस्थापनाला आणि ठेकेदाराला अनुकूल भुमिका घेत आहेत. माथाडी चळवळी विषयी सर्व माहिती असणारे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात देखिल माथीडींचे हक्क डावलून त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले जात आहेत याच्या निषेधार्थ आणि महाविकास आघाडीचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी आणि बुधवारी (दि. १५ व १६ मार्च) मुंबईत आझाद मैदानावर दोन दिवसांचे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिला. माजी आमदार नरेंद्र आण्णासाहेब प...
रहाटणी-काळेवाडीतील रस्ते दुरूस्त करा ; माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची मागणी
पिंपरी चिंचवड

रहाटणी-काळेवाडीतील रस्ते दुरूस्त करा ; माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची मागणी

पिंपरी, ता. ११ : रहाटणी - काळेवाडी परिसरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कॉक्रीटीकरण, भूमिगत गटारे, जलवाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असून नागरिक त्रस्त आहेत. रहाटणी - काळेवाडीकरांची रस्ते समस्या महापालिकेने मार्गी लावावी, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे. याबाबत तापकीर यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहाटणी - काळेवाडी परिसरातील श्रीनगर, शास्त्रीनगर, तापकीरनगर, जोतिबानगर, काळेवाडी गावठाण, आझाद चौक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कॉक्रीटीकरण, भूमिगत गटारे, जलवाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. तीन ते सहा महिन्यांपासून अंतर्गत रस्ते खोदून ठेवल्याने रहिवाशांना ...
रॉयल रहाडकी ग्रीन सोसायटीतर्फे आयोजित दुचाकी रॅलीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
पिंपरी चिंचवड

रॉयल रहाडकी ग्रीन सोसायटीतर्फे आयोजित दुचाकी रॅलीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

रहाटणी : जागतिक महिला दिनानिमित्त रॉयल रहाडकी ग्रीन सोसायटीच्या वतीने शिवराज नगर ते कोकणे चौक दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी नववारी साडी, डोक्यावर फेटा अशी महाराष्ट्राची पारंपारिक वेषभूषा करून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच सोसायटी परिसरात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी आपले कला-गुण सादर केले. यावेळी ज्येष्ठ महिलांसाठी आयोजित केलेल्या विशेष खेळांना मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक महिलांनी फॅशन शो व रॅम वॉक करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. सहभागी झालेल्या सर्वांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात व दुचाकी रॅलीत डॉ. काजल पांडे, वंदना आहुजा, प्रियंका दलाल, श्रीजिता कुंडू, आसावरी पदमावार, प्रिती शहा, प्रिती पटोदिया, स्नेहा भालकर, कल्याणी पाटील, प्रिया पाटील, विशाख...
श्री फत्तेचंद जैन विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

श्री फत्तेचंद जैन विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

चिंचवड : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री फत्तेचंद जैन विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये ८ मार्च रोजी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी जैन विद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव ऍड. राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा व सहाय्यक सचिव अनिलकुमार मोतीलाल कांकरिया यांनी सर्व महिला शिक्षकांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सहाय्यक प्रकल्प अधिकारी निरंतर शिक्षण प्रक्रिया जिल्हा परिषद, पुणे विभाग शिल्पा रोडगे यांनी शाळेस भेट दिली व सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचे स्वागत व सत्कार प्रशालेच्या प्राचार्य नवले एस. एस यांनी केले. महिला दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, जिजाऊ इत्यादी महिलांच्या वेशभूषा केल्या होत्या. याप्रसंगी प्रशालेतील सर्व महिला शिक्षकांचा व महिला पालकांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. कार्...
महिला दिनी महापौर माई ढोरे यांनी प्रभागातील महिलांना घडविली मेट्रोची सफर.
पिंपरी चिंचवड

महिला दिनी महापौर माई ढोरे यांनी प्रभागातील महिलांना घडविली मेट्रोची सफर.

स्मार्ट पिंपरी चिंचवड शहराचे नागरिक असल्याचा वाटला अभिमान पिंपरी : जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी (दि. ८) पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे यांनी प्रभागातील महिलांना महिला दिनाच्या खास पद्धतीने शुभेच्छा देत त्यांना सोबत घेऊन पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोची सफर घडविली. व म्हणाल्या कि जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. यावेळी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका शोभाताई अदियाल, भाजपा महिला अध्यक्षा पिंपरी चिंचवड शहर उज्वला गावडे, सुप्रिया चांदगुडे, कविता भिसे, मोहिनी मेटे, अलका शिवाजी काटे, मंदा वाळके आणि प्रभागातील महिलावर्ग व पिंपळे सौदागर, सांगवी व पिंपरी चिंचवड मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कुंदा संजय भिसे म्हणाल्या, भाजपच्या सत्ताकाळात मेट्रो सत्यात उतरली आहे. रविवारी पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...