पिंपरी चिंचवड

नेत्र तपासणी शिबिरास रहाटणीकरांचा प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

नेत्र तपासणी शिबिरास रहाटणीकरांचा प्रतिसाद

काँग्रेसचे रवि नांगरे यांच्यातर्फे प्रभाग ३२ मध्ये करण्यात आले होते आयोजन पिंपरी : काँग्रेसचे युवा कार्यकर्ते रवि नांगरे यांच्या वतीने सर्व वयोगटासाठी रहाटणी येथे नुकतेच मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा रहाटणीतील नागरिकांनी लाभ घेतला. त्यातील अनेकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर काहींची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे. असे नांगरे यांनी लोकमराठी न्यूजशी बोलताना सांगितले. या शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे शहराध्यक्ष गणेश नांगरे, विश्वजित जगताप, माऊली मलशेट्टी, विजय ओव्हाळ, रॉयल फाउंडेशनचे सल्लागार प्रकाश नांगरे, कार्याध्यक्ष अजय काटे, स...
काळेवाडीत होणार आदर्श महिलांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत होणार आदर्श महिलांचा सन्मान

गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२१ व नवरात्र नवरंग उत्सव २०२१ स्पर्धेचे होणार बक्षिस वितरण काळेवाडी, ता ६ : नगरसेविका निता पाडाळे व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विलास पाडाळे यांच्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त परिसरातील आदर्श महिलांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२१ व नवरात्र नवरंग उत्सव २०२१ स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळा यावेळी पार पडणार आहे. या समारंभाचे औचित्य साधून महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. काळेवाडी-ज्योतिबा नगरमधील ज्ञानेश्वर मंगल कार्यालय येथे सोमवारी (ता. ७) सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तसेच परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कला, क्रिडा अशा विविध क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या होतकरू व कर्तृत्वान आदर्श महिलांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. दरम्यान होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांना पैठणी व अनेक...
कोमल शिंदे यांचा हिरकणी पुरस्काराने होणार सन्मान
पिंपरी चिंचवड

कोमल शिंदे यांचा हिरकणी पुरस्काराने होणार सन्मान

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश मंत्री (चिटणीस) कोमल रमेश शिंदे यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनानिमित्त तुळजापूर येथे साप्ताहिक न्यूज हिरकणीच्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील आनंद नगर येथे स्थायिक असलेल्या उच्चशिक्षित कोमल शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याची महाराष्ट्र भर दखल घेतली जात असून त्या जणसामान्यांचे व मागासवर्गीय महिलांचे नेतृत्व म्हणून प्रचलित होत आहेत. दरम्यान, तुळजापूर येथील आरळी बुद्रुक येथे महिला दिनाचे औचित्य साधून ७ मार्चला या पुरस्काराचा वितरण समारंभ पार पडणार आहे. शिंदे यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्या...
प्रभाग क्रमांक ३२ मधील बंद पथदिवे सुरू करा | माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची मागणी
पिंपरी चिंचवड

प्रभाग क्रमांक ३२ मधील बंद पथदिवे सुरू करा | माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांची मागणी

पिंपरी : नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक ३२ मधील तापकीरनगर-ज्योतिबानगर-रहाटणी परिसरातील अनेक पथदिवे बऱ्याच दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरत असून तातडीने पथदिवे सुरू करण्यात यावेत. अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात मच्छिंद्र तापकीर यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक ३२ मध्ये तापकीरनगर, ज्योतिबानगर, रहाटणी या भागाचा समावेश होतो. सुमारे पन्नास हजार लोकवस्तीच्या या भागात मुलभूत सुविधांचा अभाव आहे. प्रामुख्याने सार्वजनिक रस्त्यांवरील वीजेचे खांब नुसतेच नावाला आहेत. दिवे सुमारे सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. याबाबत रहिवाशांनी तक्रारी करुनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. केवळ ठेकेदार पोसण्याचे काम अधिकारी वर्ग करत आहे. सार्वजनिक दिवाबत्ती बं...
पिंपळे सौदागर परिसरातील रखडलेली कामे त्वरित मार्गी लावा; भाजपाच्या कुंदा भिसे यांची मागणी
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागर परिसरातील रखडलेली कामे त्वरित मार्गी लावा; भाजपाच्या कुंदा भिसे यांची मागणी

महापालिका अतिरिक्त आयुक्तांसमोर मांडले पिंपळे सौंदागरमधील महत्वाचे प्रश्न अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे दिले आश्वासन पिंपरी, (दि. २३ फेब्रुवारी २०२२) : पिंपळे सौदागर हे स्मार्ट शहर म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने विकसित केले आहे. त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून मोठी विकासकामे परिसरात राबविली आहेत. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही अपूर्ण तर, काही पूर्ण अवस्थेतेतील प्रकल्प रखडून ठेवली आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत भाजपा चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चा अध्यक्षा तथा उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी महापलिका आयुक्त राजेश पाटील आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची भेट घेतली. दरम्यान, बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, नवीन पाण्याच्या टाक्या व पाईपलाईनची कामे मार्गी लावाव...
सेवा सारथीतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला बालचामुंचा उस्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

सेवा सारथीतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला बालचामुंचा उस्फूर्त प्रतिसाद

आकुर्डी ता. २२ : नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या सेवा सारथी संस्थेने दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील रविवारी (दि२० फेब्रुवारी)चिंचवड-पुर्नानगर येथील शनिमांदिर येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला मुलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या चित्रकला स्पर्धेत दोन गट पाडले होते. पहिला गट २ री ते ६ वी आणि दुसरा गट ७ वी ते १२ वी असा होता. लहानग्यांच्या नजरेतून आणि त्यांच्या कल्पनाशक्तीने साकारलेली चित्रे उद्याच्या भवितव्याची रंगीबेरंगी आकृती रचत होते. स्पर्धेचे आयोजन ओंकार मांडगे यांनी केले. या चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम हा स्पर्धेच्याच दिवशी संध्यकाळी ६:०० वाजता पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडांगण, पूर्णानगर (शानिमंदिर) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. लहान गटात राशी नागारेड्डी (प्रथम क्रमांक), रिशी नागारेड्डी (द्वितीय क्रमांक), मृण्मय तामखे...
रहाटणीत आरोग्य तपासणी व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

रहाटणीत आरोग्य तपासणी व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवजयंतीनिमित्त गणेश शिवराम नखाते सोशल फाउंडेशनतर्फे केले होते आयोजन रहाटणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रहाटणीत गणेश शिवराम नखाते सोशल फाउंडेशनच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धा व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेला मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर अनेक नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी शिवराम नखाते, अमृत नखाते, सुनिल नखाते, भास्कर दाते, बालाजी वांजे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, चित्रकला स्पर्धेत शिवाजी महाराज, संभाजी महाराज व त्यांच्या जीवनावरील प्रसंग यांचे एक चित्र मुलांना रेखाटायचे होते. तसेच आरोग्याची नियमित तपासणी होणे गरजेचे आहे, या भावनेतून या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्या...
थेरगावात शिवजयंती निमित्त कचरावेचक महिलांना साडी वाटप करून सन्मान; दोन हजार जणांना अन्नदान तर १२२ जणांचे रक्तदान
पिंपरी चिंचवड

थेरगावात शिवजयंती निमित्त कचरावेचक महिलांना साडी वाटप करून सन्मान; दोन हजार जणांना अन्नदान तर १२२ जणांचे रक्तदान

थेरगाव (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कचरावेचक महिलांना साडी वाटप करून सन्मान करण्यात आला, तसेच रक्तदान शिबिरात १२२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दोन हजार लोकांना अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शाकीर शेख व मयुर कॉलनी मित्र मंडळ केले होते. या कार्यक्रमाला शहरातून व प्रभाग क्रमांक ३५ मधून शेकडो कार्यकर्त्यांसह सुमारे ४० महिला बचत गटांनी सहभाग नोंदविला. त्यावेळी थेरगावचे युवा नेते तानाजी बारणे, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी शहर प्रमुख हाजी दस्तगीर मणियार, काळूराम बारणे, स्विकृत सदस्य नगरसेवक संदीप गाडे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, संभाजी बारणे, विनोद पवार, रवी भिलारे, नगरसेवक कैलास बारणे, नगरसेवक अभिषेक बारणे, भारत केसरी विजय गावडे, राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप पवार, नगरसेवक चंद्रकांत नखाते, प्रवीण बारणे, सामाजिक कार्यकर्ते दीपक चखाले, सागर ग...
शिवजयंती निमित्त पायी शिवज्योत मशाल रॅली
पिंपरी चिंचवड

शिवजयंती निमित्त पायी शिवज्योत मशाल रॅली

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराज उदयनराजे ट्रस्टच्या वतीने डांगे चौक ते काळेवाडीतील विजयनगर असे पायी शिवज्योत मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. राजे प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर आयोजित शिवजयंती उत्सव शिव साम्राज्य प्रतिष्ठान व शिवसंघर्ष मित्र मंडळ यांच्या सौजन्याने पार पडला. डांगे चौक ते शिव साम्राज्य चौक अशी शिव ज्योत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये थेरगाव गावठाण, अष्टविनायक मित्र मंडळ, आदर्श चौक, पंचनाथ चौक, चांगभलं चौक इत्यादी ठिकाणी ज्योतीचे दर्शन केले गेले. त्यानंतर शिव पुजन, शिव आरती, मर्दानी खेळ व शेवटी फळ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील तात्या पालकर व इरफान शेख, राजे प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहराचे कार्याध्यक्ष मोसिन शेख, उपाध्यक्ष रवी पारधे, सं...
काळेवाडीतील राधेश्याम गोशाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील राधेश्याम गोशाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

काळेवाडी : येथील राधेश्याम गोशाळेत श्री स्वामी समर्थ ग्रुपच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी मुलांनी शिवरायांवर भाषणे, गीते, पोवाडे सादर केली. त्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनिल तात्या पालकर, उमेश गुंड, श्री स्वामी समर्थ ग्रुपच्या संस्थापिका समिता समीर सुतार, राधेश्याम गोशाळेचे संचालक भगत गुरनानी, प्रकाश मूलचंदानी यांच्यासह मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच सरदार व मावळ्यांची वेशभूषा करून शिवचरित्र सादर केले. शिवरायांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता. या कार्यक्रमाला तात्या पालकर यांचे विशेष सहकार्य लाभले. दरम्यान, पालकर यांच्या हस्ते काळेवाडीतील महाराज उदयनराजे ट्...