युवकांनी करिअरचा पर्याय म्हणून ‘उद्योजकतेची’ कास धरावी – दत्तात्रय आंबुलकर यांचे आवाहन
आयआयएमएसच्या वतीने आयोजित वेबिनार संपन्न
पिंपरी : युवकांनी महाविद्यालयीन काळापासूनच करिअरसाठी केवळ नोकरी हा पर्याय डोळ्यासमोर न ठेवता 'उद्योजक' हा देखील भक्कम पर्याय असून शकतो यादृष्टीने प्रयत्नशील राहावे असे आवाहन ज्येष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापन तज्ञ दत्तात्रय आंबुलकर यांनी व्यक्त केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन - एआयसीटीई चा इनोव्हेशन विभाग व यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'उद्योजकता- करिअरचा पर्याय' या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी आपल्या मनोगतात उद्योजकतेची तयारी कशी करावी, उद्योजक म्हणून तयार होण्यासाठी कोणत्या अटी आहेत. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत? उद्योजकतेमध्ये भविष्यातील आणि अपयशाच्या शक्यता काय ...










