पिंपरी चिंचवड

धर्मराज आवटे यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर
पिंपरी चिंचवड

धर्मराज आवटे यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : महाराष्ट्र पोलिस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस हवालदार धर्मराज जनार्दन आवटे (गुन्हे शाखा) यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक जाहीर झाले आहे. याबाबतचा आदेश गुरूवारी महासंचालक सु. कु. जायसवाल यांनी काढला. दरम्यान, राज्यभरातील आठशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले असून त्यामध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पोलिस निरिक्षक शैलेश गायकवाड, सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र राठोड, पोलिस हवालदार अहमद शेख, राजेंद्र शेटे, पोलिस नाईक दत्तात्रय बनसोडे, महिला पोलिस नाईक दिपमाला लोहकरे, महिला हवालदार प्रभावती दिलीप गायकवाड यांचा समावेश आहे....
महेश प्रोफेशनल फोरमची वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माधुकरी
पिंपरी चिंचवड, सामाजिक

महेश प्रोफेशनल फोरमची वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माधुकरी

पिंपरी : महेश प्रोफेशनल फोरम त्यांच्या 'जॉय ऑफ लाइफ, या योजनेअंतर्गत गेले कित्येक वर्ष गरजवंतांना मदतीचा हात देत आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माधुकरी मागण्यांमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. ही गोष्ट महेश प्रोफेशनल फोरमपर्यंत पोहोचली आणि वारकरी रूपात असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करण्याचा योग साधण्यात आला. श्री क्षेत्र आळंदी येथील विठ्ठल महाराज देशमुख धर्मशाळा, ज्ञानेश्वरी वारकरी धर्मशाळा, आणि मुंबई डबेवाले धर्मशाळा येथील वारकरी विद्यार्थ्यांना माधुकरी गहू, तांदूळ, डाळ, पोहे आणि तेल या रूपांमध्ये देण्यात आली. वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल महेश प्रोफेशनल फोरमने वारकरी विद्यार्थ्यांचे आभार मानले. "खरा देणारा निसर्ग असतो आपण फक्त मध्यस्थी असतो म्हणून सर्वांनी निसर्गाचे उपकृत व्हावे आणि एक झाड लावून निसर्...
माजी उपमहापौर विष्णू कांबळे यांचे निधन
पिंपरी चिंचवड

माजी उपमहापौर विष्णू कांबळे यांचे निधन

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराचे माजी उपमहापौर विष्णू गुलाब कांबळे वय (७८) यांचे शुक्रवारी ( ता. 24) दुपारी पदीर्घ आजाराने निधन झाले. सोलापुर जिल्ह्यातील चौबे पिंपरी हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांचा जन्म १९४३ साली सोलापुर येथे झाला होता. नोकरीनिमित्त ते पिंपरी चिचंवड शहरात आले. त्यांनी एस के एफ कंपनीमध्ये नोकरी केली. १९८६ ते ९२ या काळात नगरसेवक पदावर निवडून आले, त्यांना महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार देण्यात आला होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षण मंडळाचे सदस्य, अध्यक्ष गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीचे, स्थायी समिती सदस्य अशा पदांवर त्यांनी काम केले. त्यांच्या कार्यकाळात चिचंवड येथे प्रेक्षाग्रह उभारण्यात आले तेच आजचे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षाग्रह आहे. ते शिवशंकर सेवाभावी चारीटेबल ट्रस्टचे संस्थापक व विजय शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूरचे संस्थापक होते. त्यांच्या मागे प...
Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले आणखी १२ करोनाबाधित रूग्ण
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले आणखी १२ करोनाबाधित रूग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एकाच दिवसात तब्बल १२ करोनाबाधित आढळल्याने सध्या शहरात भीतीचे वातावरण आहे. पिंपरी चिंचवडमधील करोनाबाधितांचा संख्या ७९ वर पोहचली आहे. आतापर्यंत २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. करोनामुळे आज ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. दरम्यान, आज सापडलेल्या १२ करोना बाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष यांचा समावेश असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने आणखीच फास घट्ट आवळला असून एकाच दिवसात तब्बल १२ जण करोना पॉजीटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. यात महिला, लहान मुले आणि पुरुष आहेत अशी माहिती महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. त्यामुळे शहरातील करोना बाधितांची संख्या ७९ वर पोहचली असून चिंता वाढली आहे. करोना बा...
Coronavirus : खरेदीत मलई खाण्यासाठी अधिकाऱ्याला दमबाजी
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Coronavirus : खरेदीत मलई खाण्यासाठी अधिकाऱ्याला दमबाजी

पिंपरी : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चालविलेल्या प्रत्येक खरेदीत आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना वाढीव दराने काम देण्यासाठी काही माजी पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांचा दबाव आणण्याचा निर्ल्लज प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरु आहे. जादा दराने ठराविक ठेकेदारांकडून खरेदी करण्यास एका अधिकाऱ्याने विरोध केला असता मंगळवारी काही माजी पदाधिकाऱ्यांनी मनपा आवारातच त्याला दमबाजी केली. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रकाराचा धसका घेतल्याने त्या अधिकाऱ्याला व्हील चेअरच्या सहाय्याने थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कोरोनाचा वाढता संर्संग रोखण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाऊन असून मनपाचे केवळ १० % कर्मचारी कामावर आहेत. तसेच महानगरपालिकेची मार्च व एप्रिल महिन्याच्या सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्या असून स्थायी समितीच्या बैठकासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. ...
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील ‘लॉकडाऊन’ यंत्रणांच्‍या समन्‍वयाचा उत्‍कृष्‍ट नमुना
पिंपरी चिंचवड

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील ‘लॉकडाऊन’ यंत्रणांच्‍या समन्‍वयाचा उत्‍कृष्‍ट नमुना

पुणे : करोना बाधित क्षेत्र असलेल्या दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बुधवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्याच आले आहेत. या ठिकाणी फक्त सकाळी दहा ते बारा या वेळेत दूध विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी मंगळवारी रात्री हे आदेश काढले. दुधाच्या वाहतुकीवर बंधन राहणार नाही. मात्र, घरी जाऊन दूध वितरणावर बंधन राहणार आहे. २४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत हे आदेश लागू राहतील. प्रतिबंधित पोलीस ठाणे व त्यांचे भाग समर्थ पोलीस ठाण्याचा पूर्ण भाग खडक पोलीस ठाण्याचा पूर्ण भाग फरासखाना पोलीस ठाण्याचा पूर्ण भाग स्वारगेट पोलीस ठाणे- गुलटेकडी, महर्षीनगर, डायस प्लॉट बंडगार्डन पोलीस ठाणे- ताडीवाला रोड दत्तवाडी पोलीस ठाणे- जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन येरवडा पोलीस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ खडकी पोलीस ठाणे- खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट...
Coronavirus : त्या तरुणाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह…
पिंपरी चिंचवड

Coronavirus : त्या तरुणाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह…

पिंपरी : वडगाव शेरी भागातील राहणाऱ्या आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झालेल्या एका २७ वर्षीय तरुणाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे शहरात कोरोना रुगणांची संख्या ४३ वर पोहचली आहे. शहरामध्ये आजपर्यंत ६३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सोमवार (दि.२०) रोजी ४५ संशयित रुग्णांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्हीकडे पाठविले होते. नमुने पाठविलेल्याचे रिपोर्ट रात्री उशीरा आले असून त्यात पुण्यामधील एक रुग्ण वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. मागील १३ दिवसात ४२ नविन रुग्णांची भर ! शहरात ८ एप्रिलपासून दररोज कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण अढळून येत आहेत. ०८ एप्रिल – ०१ रुग्ण ०९ एप्रिल&nbsp...
कामगारांची उपासमार टाळण्यासाठी सोनिया भोजन थाळी सुरू करण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

कामगारांची उपासमार टाळण्यासाठी सोनिया भोजन थाळी सुरू करण्याची मागणी

पिंपरी (लोकमराठी) : महाराष्ट्रात 23 मार्चपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रातील गरजु कष्टकरी कामगारांना त्यांच्या कुटुंबासहीत उपासमारीची वेळ आली आहे. तरी त्यांच्यासाठी किमान जेवणाची सोय व्हावी म्हणून ज्या पद्धतीने शिवभोजन व शरदभोजन थाळी सुरू करण्यात आली, त्याप्रमाणेच सोनिया भोजन थाळी सुरू करण्यात यावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड असंघटित कामगार काँग्रेसचे सुंदर कांबळे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. याबाबत कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनिया भोजन थाळी सुरू केल्यास त्याचा फायदा आता कोरोनाच्या काळात कामगारांना होईल. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कष्टकरी कामगार वर्ग हा सर्वात जास्त काँग्रेसप्रेमी असून इंदिरा गांधी यांच्यापासून काँग्रेसने नेहमी कष्टकरी कामगार वर्गाचा विचार केला आहे. त्यामु...
Lockdown : पिंपरीत जूनपर्यंत कर सूट
पिंपरी चिंचवड

Lockdown : पिंपरीत जूनपर्यंत कर सूट

आयुक्तांचा ३०० गृहसंस्थांशी वेबसंवाद, प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी : पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने आयोजित वेबसंवादात पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे आदींनी संवाद साधला आणि तब्बल तीनशे नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन केले. महापालिकेने कर भरण्यासाठी जूनपर्यंत सूट दिली असून या काळात कोणताही दंड आकारला जाणार नसल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात हर्डीकर म्हणाले की, शहरातील गृहनिर्माण सोसायटय़ांपुढे पालिकेच्या करांबाबत बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. तूर्त पालिकेने जूनपर्यंत कर भरण्याची सूट दिली आहे. मात्र, मालमत्ता करात सवलत देण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आर्थिक स्थितीचे विश्लेषण करून या विषयी योग्य वेळी निर्णय घेण्याचे आश्वासन आयु...
covid-19 : पिंपरी-चिंचवड शहर मध्यरात्रीपासून होणार सील
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

covid-19 : पिंपरी-चिंचवड शहर मध्यरात्रीपासून होणार सील

पिंपरी (लोकमराठी) : कोरोना विषाणूने जगभरात थैमान धालते असून देश, राज्याबरोबर शहरातही कोरोना बाधितांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी रविवारी (दि. 19 एप्रिल) मध्यरात्री बारापासून 27 एप्रिलपर्यंत संपूर्ण शहरच सील करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहराच्या सर्व सीमा आणि प्रमुख रस्ते बंद करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, नागरिकांच्या हालचाली व बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्यासाठी संपूर्ण शहर सील केले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून ( दि. 20) नागरिकांना काही सवलती देण्यात येणार होत्या. मात्र, त्या दिल्यास कोरोनाचा आणखी प्रसार होऊ शकतो. त्यात शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असून पुणे शहरासह चाकण, हिंजवडी औद्योगिक क्षेत्र लागून आहे. त्यामुळे नोकरी आणि कामानिमित...