Covid-19 : पिंपरी चिंचवडमधील या भागात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण
पिंपरी, ता. 16 (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय कोरोनाचे किती रुग्ण आहेत. याची आकडेवारी असलेला नकाशा प्रसारित केला आहे. त्यामध्ये ई क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत सर्वात जास्त कोरोना बाधित रूग्ण असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात आजपर्यंत एकुण 48 कोरोना विषाणू सकारात्मक रूग्ण सापडले असून त्यापैकी 12 रूग्ण उपचारानंतर कोरोना मुक्त झाले आहेत. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
ही आहेत आठ क्षेत्रीय कार्यालये
अ प्रभाग (रूग्ण संख्या - ०१) प्रभाग क्रमांक १० (संभाजीनगर), प्रभाग क्रमांक १४ (मोहननगर, आकुर्डी), प्रभाग क्रमांक १५ (प्राधिकरण) आणि प्रभाग क्रमांक १९(आनंदनगर, भाटनगर).
ब प्रभाग (रूग्ण संख्या - ००) प्रभागातील परिसर प्रभाग क्रमांक १...