पिंपरी चिंचवड

Covid-19: कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याच्या वारसाला मिळणार 75 लाख; नोकरीही
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Covid-19: कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याच्या वारसाला मिळणार 75 लाख; नोकरीही

पिंपरी चिंचवड महापालिका अधिकारी व कर्मचारी सुरक्षा कवच योजनेअंतर्गत अर्थसहाय्य; महापौर माई ढोरे यांची माहिती लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी (पुणे) : कोरोना विषाणूवर (कोवीड-१९)नियंत्रण मिळविण्यासाठी व त्याचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. ही जबाबदारी पार पाडत असतांना त्यांचा प्रत्यक्ष कोरोनाग्रस्त रूग्णांशी संपर्क येत आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच योजनेअंतर्गत कोरोना संसर्ग होवून दिवंगत झाल्यास त्यांच्या वारसांना राष्ट्रीय स्वास्थ्य योजनेअंतर्गत पन्नास लाख, महापालिका कामगार निधीतून पंचवीस लाख रूपयांचे अर्थसहाय्य व त्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आली. तसेच वारस नोकरी न घेतल्यास अतिरिक्त पंचवीस लाख रूपये देण्यात येणार आहेत. कोरो...
PCMC : झोपडपट्टीत सर्दी, खोकला, तापाची तपासणी करण्यात यावी
पिंपरी चिंचवड

PCMC : झोपडपट्टीत सर्दी, खोकला, तापाची तपासणी करण्यात यावी

पिंपरी, (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टी भागात सोशल डीस्टॅन्स ठेवणे खूप अवघड असते, गजबजलेला परिसर असल्यामुळे तसेच सार्वजनिक शौचालय, घराला घर चिटकुन असल्यामुळे संसर्ग वाढण्याची खूप भीती असते. म्हणून काही ठराविक डॉक्टरांची टीम पाठवून प्रथम आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले यांनी महापालिका आयुक्तांना केले आहे. दिपक चखाले म्हणाले की, दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे थैमान पसरत असताना खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील झोपडपट्ट्यांकडे विशेष लक्ष देऊन झोपडपट्टीत सर्दी, खोकला, ताप आदींची तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच औषध फवारणीही करणे महत्त्वाचे आहे....
Wakad : मार्शल कॅडीट फोर्स तर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप
पिंपरी चिंचवड

Wakad : मार्शल कॅडीट फोर्स तर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप

वाकड (लोकमराठी) : कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व जनजीवन विस्कळित झाले आहे. याचा सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्य जनतेला बसताना आपणास दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये काही स्वयंसेवी संस्था, अनेक सामाजिक कार्यकर्ते आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत. याचाच एक भाग म्हणून मार्शल आर्टमध्ये प्राविण्य असलेली मार्शल कॅडिट फोर्स लोकांच्या मदतीला धावून आली. मार्शल कॅडीट फोर्सचे संचालक गणेश बोऱ्हाडे आणि वाकड येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक चखाले, सागर गायकवाड, विकास जगधने, किशोर खंडागळे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब पाटोळे यांनी म्हातोबा नगर, काळाखडकमधील झोपडपट्ट्यांत गरजू लोकांना अत्याआवश्यक अन्नधान्य वाटप केले....
#Coronavirus : पिंपरी – चिंचवडमधील आज मध्यरात्री ‘हे’ भाग होणार सील
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

#Coronavirus : पिंपरी – चिंचवडमधील आज मध्यरात्री ‘हे’ भाग होणार सील

पिंपरी, ता. 8 (लोक मराठी) : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये, याकरता पिंपरी - चिंचवड शहरातील काही परिसर आज मध्यरात्रीपासून सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी - चिंचवड महापालिका प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढू, नये याकरता अंमलबजावणी करण्यात आली आहे. पिंपरी - चिंचवडमधील हे भाग होणार सील पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार; आज मध्य रात्री शहरातील चार भाग सील करण्यात येणार आहेत. यामध्ये पुढील भागांचा समावेश आहे. १) पवार इंडीस्ट्रीयल परीसरातील घरकुल रेसीडेन्सी बिल्डींग क्र. ए १ ते २० चिखली. २) जामा मस्जिद, खराळवाडी. (गिरमे हॉस्पीटल, अग्रेसन लायब्ररी, क्रिश्ना ट्रेडर्स, चैताली पार्क हौसिंग सोसायटी गार्डन, ओम हॉस्पीटल, ओरीयंटल बँक, सीटी प्राईड हॉटेल, क्रिस्टल कोर्ट हॉटेल, गिरम...
१५० गरजू कुटुंबियांना एक महिन्याचे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या संचचे वाटप
पिंपरी चिंचवड

१५० गरजू कुटुंबियांना एक महिन्याचे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या संचचे वाटप

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी-चिंचवड : शहरातील वंचित, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या १५० कुटुंबियांना एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या संचाचे वाटप "अन्नपूर्णा आपल्या दारी" या उपक्रमाद्वारे घरपोच करण्यात आले. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती, डायमंड सोशल अँक्टिव्हिटी ग्रुप, मुनोत भाईपा पिंपरी चिंचवड ग्रुप व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांचे संयुक्त विद्यमाने शहरात महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गव्हाचे पीठ, तांदूळ,तूरडाळ,मुगडाळ,हरबरा डाळ,साखर,गुळ, हिरवे मूग,मिरची पावडर,हळद,चहा पावडर, खाण्याचे तेल, मसाला, डिटर्जंट पावडर, साबण आदी वस्तूंचा या जीवनावश्यक संचमध्ये समावेश आहे. मार्च २०२० च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शहरात कोरोनाचे रुग्ण आढळुन आले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना या घातक विषाणूच्या संसर्गामूळे आपत्कालीन कर्फ...
लॉकडाऊनमध्येही पीसीईटीच्या तर्फे ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरु
पिंपरी चिंचवड

लॉकडाऊनमध्येही पीसीईटीच्या तर्फे ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरु

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा सर्व शाखांमध्ये उपक्रम लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी (पुणे) : कोरोना संसर्गामुळे मागील बारा दिवसांपासून देशभर लॉकडाऊन आहे. शासनाच्या आदेशानुसार मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. बहुतांश शाळा महाविद्यालयातील अभ्यासक्रम शिकविणे अद्यापही बाकी आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. ही विद्यार्थ्यांची अडचण विचारात घेऊन पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या अंतर्गत असणा-या सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर प्रभावीपणे करण्यात येत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी प्रसिद्धीस दिली आहे. पीसीईटी अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय, तंत्रनिकेतन, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर व मॅनेजमेंट महाविद्यालय आहेत. या सर्व शा...
India Fights Corona : “श्री फाउंडेशन” तर्फे पोलिसांना सॅनिटायझर, टिसू व मास्कचे वाटप
पिंपरी चिंचवड

India Fights Corona : “श्री फाउंडेशन” तर्फे पोलिसांना सॅनिटायझर, टिसू व मास्कचे वाटप

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सॅनिटायझर बाजारातून गायब झाले आहे. तर अनेक ठिकाणी सॅनिटायझर आणि मास्कचा काळाबाजार सुरु आहे. असे आढळून आल्याने "श्री फाउंडेशन" च्या वतीने वाकड पोलिस ठाणे व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पासपोर्ट विभाग येथे 70 पोलिस कर्मचारींना नुकतेच सॅनिटायझर, टिसू व मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. “कोरोना” चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किमान 20 सेकंद साबणाने हात धुवावेत व बाहेरुन आल्यानंतर हाताला सॅनिटायझर लावावे. असे श्री फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुशांत पांडे यांनी सांगितले. तसेच यावेळी पासपोर्ट विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांनी कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी, याची माहिती दिली. सर्दी, ताप, खोकला तसेच श्वसनाचा त्रास होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले. यावेळी पोलीस ...
Lockdown: दोन तरूण देताहेत 270 विद्यार्थ्यांना मोफत जेवण
पिंपरी चिंचवड

Lockdown: दोन तरूण देताहेत 270 विद्यार्थ्यांना मोफत जेवण

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : कोरोनाच्या पाश्वभुमीवर संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे जेवणाचे मोठे हाल होत आहेत. अशा परिस्थित दोन तरूणांनी पुढाकार घेत श्री धनंजय मुंढे युवा मंचच्या माध्यमातून 270 विद्यार्थ्यांना मोफत घरपोच जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. विजय वडमारे व सचिन बढे अशी या तरूणांची नावे आहेत. कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असल्याने भारत सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 24 मार्च पासून संपुर्ण देशात संचार बंदी लागू केली. त्यामुळे खानावळी व हॉटेल बंद करण्यात आली. परिणामी परराज्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून शहरात शिक्षण व स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे मोठे हाल सुरू झाले. विजय वडमारे व सचिन बढे ही बाब लक्षात घेता विजय वडमारे व सचिन बढे यांनी 270 विद्यार्थ्यांची जेवणाची मोफत सोय केली आहे. पिंपरीत...
#Lockdown : चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे काळेवाडीत 400 लोकांना अन्नदान
पिंपरी चिंचवड

#Lockdown : चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे काळेवाडीत 400 लोकांना अन्नदान

पिंपरी, (लोकमराठी) : चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने काळेवाडी येथील तापकीर नगर झोपडपट्टीमधील 400 लोकांना आज (शुक्रवारी) अन्नदान करण्यात आहे. कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून भारतात या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपुर्ण देशच लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे मोठे हाल होत आहेत. या मजुरांच्या जेवणाचे हाल होऊ नये, यासाठी चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेत काळेवाडीतील 400 गरजू लोकांना अन्नदान केले. त्यावेळी स्विकृत सदस्य विनोद तापकीर व सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे उपस्थित होते. https://youtu.be/A1nyL4nWcxs Subcribe | Share |Like...
श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान तर्फे गरजूंना धान्य वाटप
पिंपरी चिंचवड

श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान तर्फे गरजूंना धान्य वाटप

चिंचवड (लोकमराठी) : शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या तर्फे गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्यामुळे गरजूंनी समाधान व्यक्त केले. जास्तीत नागरिकांनी आपल्या आसपासच्या गरजूंना अन्नधान्य वाटप करावे. असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या देशावरती कोरोना विषाणुच्या भयंकर संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामूळे बहुसंख्य लोकांना आपला रोजगार सोडून घरी बसावे लागले आहे. त्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गरजूंना गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, साखर, तेल, मसाला, गूळ असे अन्नधान्याचे किट देण्यात आले. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक नारायण बहिरवाडे व मंगेश पाटील यांच्या हस्ते ग...