पिंपरी चिंचवड

मराठी साहित्य हे मराठी संस्कृतीचे बलस्थान आहे – राजन लाखे
पिंपरी चिंचवड

मराठी साहित्य हे मराठी संस्कृतीचे बलस्थान आहे – राजन लाखे

rajan_lakhe पिंपरी : मराठी भाषेचे प्राचीनत्व शिलालेख, ताम्रपट, ग्रंथ यातून उलगडले आहे. संतांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. लय, भाव, रूप, कल्पना सौंदर्य यामधून संतांच्या ओव्या, अभंग नटले आहे. “युगे वर झाली युग, युग झाली अठ्ठावीस, कुणी म्हणे ना ग बाई, माझ्या विठ्ठलाला बसं “मराठीचा हाच काव्यरूप वारसा आजच्या कुसुमाग्रज वि. दा करंदीकर, शांता शेळके, इंद्रजीत भालेराव, दया पवार इत्यादी आधुनिक कवींनी जपला आहे. मराठी साहित्य, मराठी कविता ही मराठी भाषेचे बलस्थान आहेत, असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ‘मराठी भाषा व मराठी कविता या विषयावर राजन लाखे यांनी आपले विचार मांडले. मराठी भाषा ही संस्कृत, तेलगू, कन्नड मल्याळी, इंग्रजी आशा या भाषा ...
डिलक्स चौकात रस्ता दुभाजक बसविण्याची मागणी
पिंपरी चिंचवड

डिलक्स चौकात रस्ता दुभाजक बसविण्याची मागणी

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : डिलक्स चौकात रस्ता दुभाजक नसल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. तसेच अनेकदा येथे छोटे-मोठे अपघात होतात. त्यामुळे या ठिकाणी रस्ता दुभाजक बसविण्यात यावा, अशी मागणी अपना वतन संघटनेचे शहराध्यक्ष जितेंद्र जुनेजा यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 'ग' क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की डिलक्स चौकात काळेवाडी, रहाटणी, पिंपरीगाव येथून पिंपरी आंबेडकर चौक, भाटनगर, मोरवाडीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहतुकीचा मार्गक्रम आहे. पिंपरी मार्केट जवळच असल्यामुळे येथे कायमच नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, डिलक्स सिनेमागृहासमोर रस्ता दुभाजक नसल्याने वाहनचालक कशाही पद्धतीने वाहने चालवतात. त्यामुळे कायमच कोंडी होत असते. तसेच येथील अंजली मेडीकल व दवाखान्यासमोर रस्त्याच्या मधोमध पथदिव्याचा खांब असून त्याला जोडूनच रस्तादुभाजक कराची चौक...
शहरात चिनी मांजाची सर्रास विक्री, नागरिकांचे जीव जात असतानाही प्रशासन झोपेतच
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

शहरात चिनी मांजाची सर्रास विक्री, नागरिकांचे जीव जात असतानाही प्रशासन झोपेतच

पिंपरी चिंचवड : मानवासह पशु-पक्षांचा जीव घेणाऱ्या चिनी मांजावर बंदी असताना शहरात मांजाची सर्रास विक्री होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत पोलिस व पिंपरी चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग गाड झोपेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिनी मांजामुळे मानवासह पक्षांचेही जीव जात असल्याने न्यायालयाने मांजावर बंदी घातली. परंतु बंदी झुगारून मांजाची विक्री केली जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक जखमी होत असून अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा आहे. शहराच्या विविध भागात असा मांजा मिळत असून मुलांकडून त्याची खरेदी केली जाते. दरम्यान, काही दिवसांपुर्वी पिंपरीतील साई चौकातून मुंबई-पुणे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी चिनी मांजाने भरलेला रिळ मुलांकडून हस्तगत केला. मांजा कुठ...
मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री, त्यामुळे मी पुन्हा येईन – देवेंद्र फडणवीस
राजकारण, पिंपरी चिंचवड

मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री, त्यामुळे मी पुन्हा येईन – देवेंद्र फडणवीस

पिंपरी चिंचवड : आई, वडील, शिक्षक यांच्याकडून आणि महाविद्यालयीन काळात आरएसएसच्या माध्यमातून मला संस्काराचे धडे मिळाले. संस्कार म्हणजे विवेक, चांगल्या वाईटातील अंतर समजणे म्हणजेच संस्कार होय. छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा माझ्यावर पगडा आहे. त्यांच्या विचारांमुळेच मला प्रेरणा मिळाली. प्रत्येक काम करताना मी सकारात्मक विचारानेच केले. त्यामुळेच मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री’ आहे. त्यामुळे मी पुन्हा येईन अशी मिश्किल टिपणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्तव्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी शनिवारी (दि. 10) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित मोरया युथ फेस्टिव्हल 2020 चे आणि स्मृतीचिन्हाचे उद्‌घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडण...
चिंचवडमध्ये स्टार्स एलेवेन क्रिकेट आकादमीचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड

चिंचवडमध्ये स्टार्स एलेवेन क्रिकेट आकादमीचे उद्घाटन

Follow चिंचवड : प्रभाग क्र. 18 मधील मोरया गोसावी स्टेडियम या ठिकाणी 'स्टार्स एलेवेन' या क्रिकेटआकादमीचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, राजेंद्र तानाजी गावडे, मोरेश्वर भोंडवे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, क्रिडा अधिकारी राजेंद्र कोतवाल, महाराष्ट्र क्रिकेट बोर्ड सदस्य सुनिल मुथा, शिवाजी उदय मंडळ अध्यक्ष सदाशिव गोडसे, माजी अध्यक्ष राजाराम गावडे, क्रिकेट अकादमीचे संचालक अमित भोंडवे, प्रमोद टोणपेकर, तसेच प्रभागातील क्रिकेट प्रेमी, नागरिक उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी ईच्छुक खेळाडूंनी ९८२२४७७१११, ९८२२५१०४४० या नंबरवर संपर्क साधावा. असे आवाहन अमित भोंडवे यांनी केले आहे....
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची अपना वतनची मागणी
पिंपरी चिंचवड

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची अपना वतनची मागणी

जेएनयू मधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ थेरगाव मध्ये " कँडल मार्च " पिंपरी : दिल्ली येथे जेएनयू मधील विद्यार्थ्यांवरील रविवारी रात्री झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ अपना वतन संघटनेच्या वतीने मंगळवार (दि. ७) संध्याकाळी थेरगाव येथील धनगर बाबा मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी मधील विद्यार्थ्यांवरील हल्लयाच्या निषेधार्थ हिटलर शाही मुर्दाबाद, तानशाही मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद, अमित शहा राजीनामा द्या अशा घोषणा देण्यात आल्या. यामध्ये थेरगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख म्हणाले की, "विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, परंतु या विद्यार्थ्यांवर हल्ला करून हल्लेखोरांनी अतिशय निदनीय कृती केली आहे. विद्यार्थ्यांवर भारताच्या राजधानीमध्ये घोळक्याने काही ग...
नगरसेविका सुनिता तापकीर व युवानेते राज तापकीर यांच्या २०२० वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन
पिंपरी चिंचवड

नगरसेविका सुनिता तापकीर व युवानेते राज तापकीर यांच्या २०२० वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन

पिंपरी, (लोकमराठी) : नगरसेविका व महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सुनिता हेमंत तापकीर आणि चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष राज हेमंत तापकीर यांनी प्रकाशित केलेल्या २०२० या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडगिरे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक चंद्रकांत नखाते, भाजपा नेते अमोल थोरात यांच्यासह भाजपचे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते....
सुमन वाकचौरे यांचे निधन
पिंपरी चिंचवड

सुमन वाकचौरे यांचे निधन

पिंपरी चिंचवड : निगडी येथील सुमन धोंडीबा वाकचौरे ( वय ७२, रा. दत्तनगर, निगडी, पुणे) यांचे बुधवारी (ता. २५) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या संजय वाकचौरे व प्रहार अपंग संघटना, पिंपरी चिंचवड शहरचे उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांच्या मातोश्री होत. तर शुभम हेमंत जोर्वेकर यांच्या आजी होत.
30 कोटींच्या डस्टबिन खरेदीला तूर्तास स्थगिती
पिंपरी चिंचवड

30 कोटींच्या डस्टबिन खरेदीला तूर्तास स्थगिती

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेने डस्टबिन खरेदी करण्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र, ती रक्कम डस्टबिन खरेदीसाठी आवश्यक नसल्याने त्यातील 18 कोटी रुपये आरोग्य विभागाच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी वर्ग करण्यात आले आहेत. कचरा विलगीकरणाच्या उद्देशासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुन्हा डस्टबिन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गैरव्यवहार व चुकीच्या खरेदीप्रक्रियेचे जोरदार आरोप झाल्यानंतर आरोग्य विभागाने माघार घेतली आहे. आता डस्टबिन खरेदीचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम या योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून डस्टबिन खरेदी करण्यात आली. मार्च 2014 मध्ये 6 कोटी 59 लाख 61 हजार 289 रुपये खर्चून 9 लाख 30 हजार 344 डस्टबीन भांडार विभागामार्फत खरेदी करण्यात आले होते. त्यात मोठ्या प्र...
कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दारुच्या दुकानात डांबले
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दारुच्या दुकानात डांबले

वल्लभनगरमधील हिरामोती वाईन्स दुकानातील प्रकार पिंपरी चिंचवड : प्लास्टिक पिशव्या वापरणा-या व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही कर्मचा-यांना मद्य विक्रीच्या दुकानात दुकानमालकाने डांबून ठेवले. हा प्रकार वल्लभनगर एसटी बस स्थानकाच्या समोरील हिरामोती वाईन्स शॉपी येथे शुक्रवारी (ता. 27) दुपारी बाराच्या सुमारास घडला. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दुकानमालक संतोष रमेश शिरभाते (वय 46) आणि रमेश शिरभाते (वय 65, दोघे रा. वल्लभनगर, पिंपरी) यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सुनिल हरिश चौहान (वय 54, रा. प्राची अपार्टमेंट, आनंद सिनेमा शेजारी, घोरपडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी ...