एमआयएम ने आपण भाजपा विरोधी असल्याचे कृतीतून सिद्ध करावं : अतुल लोंढे
एमआयएमशी आघाडीचा कोणताही प्रस्ताव नाही
मुंबई, दि. १९ मार्च : भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी एमआयएम महाविकास आघाडी सोबत युती करायला तयार आहे. असे वक्तव्य एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. पण त्यांच्या पक्षाच्या गेल्या काही वर्षांच्या वाटचालीतून मात्र तसे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी आपण भाजपविरोधी असल्याचे सिद्ध केले पाहिजे आणि मगच युती आणि आघाडीच्या बाबत चर्चा केल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते आणि सरचिटणीस अतुल लोंढे यांनी केली.
जलील यांच्या वक्तव्यावर बोलताना लोंढे म्हणाले युती किंवा आघाडी ही समान विचारधारा आणि समान उद्देश असणा-या पक्षासोबत केली जाते. विरूद्ध किंवा वेगळ्या विचारधारा असणा-या पक्षांसोबत आघाडी होऊ शकत नाही. महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी...










