जोशी महाविद्यालयात थोर समाजवादी नेते एस. एम. जोशी यांची जयंती साजरी
हडपसर - १२ नोव्हेंबर, प्रतिनिधी- डॉ. अतुल चौरे : हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम.जोशी महाविद्यालयात थोर स्वातंत्र्य सेनानी, समाजवादी नेते व कामगार नेते श्रीधर महादेव जोशी उर्फ एस. एम. जोशी यांची जयंती सांस्कृतिक विभाग व ग्रंथालय विभागामार्फत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब म्हणाले, एस. एम. जोशी हे थोर स्वातंत्र्य सेनानी, समाजवादी नेते व कामगार नेते होते. आपल्या प्रामाणिक आणि सात्विक व्यक्तिमत्त्वाने त्यांनी त्या काळातील अनेकांना सामाजिक कामाची प्रेरणा दिली. विद्यार्थी दशेत असताना ते महात्मा गांधी यांच्या चळवळीने प्रभावित झाले. काही विशिष्ट ध्येय, जीवनमूल्ये आणि निष्ठा घेऊन त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. पुढे ते कामगार पुढारी 'एसेम' या नावाने लोकांमध्ये परिचित झाले. १ ९ ४...










