पुणे

Coronavirus : पुणे शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण
पुणे

Coronavirus : पुणे शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण

पुणे (लोकमराठी) : पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. आज आणखी १५ कोरोनाग्रस्त रूग्णांची त्यात भर पडली आहे. या १५ पैकी ११ जणांवर नायडू रूग्णालयात तर चार जणांवर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज १५ रुग्णांची भर पडल्यामुळे पुणे शहरातील रूग्णांची संख्या १९० झाली आहे तर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २२५ झाल्याची माहीती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. दरम्यान, राज्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या राज्यात १,३८० जण करोनाग्रस्त असल्याचं सांगण्यात येत आहे. यापैकी ११७ जण करोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. दरम्यान पुणे शहरातील मंडईत भाजी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्यामुळे आणि भाजी खरेदी दरम्यान सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) पाळले जात नसल्याचे सातत्याने पुढे आल्यामुळे आता दिवसातून के वळ प...
Pune : पुणे सराफ असोसिएशनकडून 21 लाख रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत
पुणे

Pune : पुणे सराफ असोसिएशनकडून 21 लाख रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

पुणे (लोकमराठी) : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पुणे सराफ असोसिएशनच्या वतीने 21 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सेक्रेटरी अमृत सोलंकी, खजिनदार कुमारपाल सोलंकी, माणिकलाल बलडोट, उगम गुंदेचा, गौतम सोलंकी, कांतीलाल ओसवाल, फुलचंद ओसवाल, नेमीचंद कोरमता उपस्थित होते. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. त्यात आर्थिक बाजू कोलमडू नये यासाठी अनेक लोक, संस्था मदतीचा हात पुढे करत आहेत....
त्याला मारले असेल तर चांगलेच केले असे विकृत ठेचले पाहिजे – रुपाली ठोंबरे
पुणे

त्याला मारले असेल तर चांगलेच केले असे विकृत ठेचले पाहिजे – रुपाली ठोंबरे

पुणे (लोकमराठी): एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. एकीकडे भाजपाकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात असताना मनेसकडून मात्र जितेंद्र आव्हाड यांचं समर्थन करण्यात आलं आहे. मनसेच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांची बाजू मांडताना विकृत पोस्ट केली म्हणून मारले असेल तर चांगलंच केले असे म्हटले आहे. रुपाली ठोंबरे यांनी म्हटले की, “अरे काहीही पोस्ट, कमेंट..काही करणार का. सोशल मीडिया आहे आपल्या विकृतीचे साधन नाही हो. चांगले घ्या की सोशलमधून. बरी विकृती करायला हात, मन धजावते कसे. मंत्री असो, सेलिब्रिटी असो की कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी… कमेंट विकृत करूच नये आणि केली तर विकृतीप्रमाणे मार खावा. जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत जी काही विकृत पोस्ट केली म्हणून त्याला मारल...
Coronavirus : पुण्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर तर रुग्ण संख्या २०४
पुणे, मोठी बातमी

Coronavirus : पुण्यात कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर तर रुग्ण संख्या २०४

पुणे (लोकमराठी): पुण्यात दिवसेंदिवस परिस्थिती खूपच गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत प्रत्येक दिवसाला नवा आकडा नोंदवून तो वाढला जातोय. आज हा 204 वप पोहचला आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर गेली असून त्यातील एक बारामती तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. काल पुण्यात एकाच दिवशी 8 जणांना कोरोनाने आपले प्राण गमवावे लागले. पुणे शहरात १६८, पिंपरी चिंचवड २२, पुणे ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या आजपर्यंत(गुरूवार दुपार) नोंदवली गेली आहे. अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. दरम्यान, पुण्यात रूग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता प्रशासनाने अधिक खबरदारी घेतली आहे. कामाविना फिरणाऱ्यांवर आता गुन्हा दाखल होणार आहे. तर अत्यावश्यक गरजांसाठी बाहेर पडणाऱ्या सगळ्यांना आता मास्क लावणं बंधनकारक आहे....
वडगाव मावळ न्यायालयात होमिओपॅथीक प्रतिबंधक औषधांचे वाटप
पुणे

वडगाव मावळ न्यायालयात होमिओपॅथीक प्रतिबंधक औषधांचे वाटप

मावळ (लोकमराठी) : वडगाव मावळ येथील चंद्रभागा हॉमिओपॅथिक क्लिनिक, काटे असोसिएट्स, ऍडव्होकेट यांच्या वतीने वडगाव न्यायालयातील न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचारी यांना हॉमिओपॅथीक प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करण्यात आले. सद्यस्थितीत सुरू असलेल्या संसर्गजन्य कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वडगाव न्यायालयातील न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचारी आपले कर्तव्य निस्वार्थीपणे पार पाडत आहेत. त्यांच्या कर्तव्याप्रती निष्ठा ठेवून त्यांच्या कार्यात खारीचा वाटा म्हणून व आपले बांधव निरोगी राहून त्यांची सेवा अखंड सुरू रहावी तसेच त्यांचे कुटुंब देखील निरोगी रहावे यासाठी चंद्रभागा होमिओपॅथीक क्लिनिक, काटे असोसिएट व ऍडव्होकेट्स यांच्या वतीने ७२ न्यायालयीन कर्मचारी व दोनशे पोलिस कर्मचारी यांना प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप करण्यात आले. डॉ. अक्षय तुकाराम काटे, ऍड. धनंजय काटे व ऍड. चेतन कदम उपस्थित होते....
लायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत
पुणे

लायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

पुणे (लोकमराठी): लायन्स क्लब ऑफ सारस बाग यांच्या वतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, लायन्स क्लब सारसबागचे अध्यक्ष नितीन मेहता,लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष फत्तेचंद रांका,खजिनदार योगेश शहा,संतोष पटवा,पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया उपस्थित होते. पुणे व्यापारी महासंघ, पुणे सराफ असोसिएशन आणि गोडवाड जैन संघ यांच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर्स,पोलीस,सफाई कर्मचारी आणि बेघर नागरिकांसाठी करण्यात येत असलेल्या मदातकार्याची माहिती फतेचंद रांका यांनी यावेळी डॉ. म्हैसेकर यांना देऊन पुणे व्यापारी महासंघ आणि पुणे सराफ असोसिएशनच्या वतीने अधिकाधिक व्यापारी वर्ग मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भरीव मदत करतील, असे सा...
पुणे

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी ताब्यात | LCB पुणे ग्रामीण शाखेची कारवाई

लोकमराठी न्यूज नेटवर्क पुणे : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली LCB टिमने बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल (गु.र.नं. १९/२०१९ भादंवि क. ३९४, ३४) असलेल्या गुन्हयातील पाहिजे आरोपी (यादी क्र.१५५) सुरेश लक्ष्मण कर्चे (वय ३६, रा. सिंहगड रोड, गणेश मळा, चुनाभट्टी, १२२ पुणे-३०. मूळ रा. पिंपरी ता. माळशिरस जि. सोलापूर) याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. दरम्यान, सदर आरोपी याची वैदयकिय तपासणी करुन बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले. आरोपी कर्चे याच्यावर यापूर्वी उस्मानाबाद पोलीस स्टेशनमध्ये (गु.र.नं. २८/१२ भादंवि क.३९५) व सांगवी पोलीस स्टेशनमध्ये (गु.र.नं. ४२९/१४ भादंवि क.३०४-अ) गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गु...
लोकसंख्या उत्पादनक्षम झाली तरच भारत महासत्ता बनू शकेल – डॉ. जे. एस. पाटील
मोठी बातमी, पुणे

लोकसंख्या उत्पादनक्षम झाली तरच भारत महासत्ता बनू शकेल – डॉ. जे. एस. पाटील

लोकमराठी न्यूज नेटवर्क औंध : आज १३७ कोटी लोकसंख्येचा तरुण भारत देश आहे. ही लोकसंख्या उत्पादनक्षम झाली तरच भारत महासत्ता बनू शकेल. आजच्या लोकसंख्येला योग्य दिशा देणे व बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे ही आजची खरी आव्हाने आहेत. युवकांच्या हाताला जर काम मिळाले नाही. तर भारत देशाचे महासत्ता होण्याचे स्वप्न अपुरे राहू शकते. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी शासन व्यवस्थेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत डॉ. जे. एस. पाटील यांनी येथे व्यक्त केले. येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, नियोजन व विकास विभाग गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२० रोजी "भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि संधी" या विषयावर करण्यात आले होते. चर्चासत्राचे उद्ध...
#Alandi : हरिपाठ न आल्याने महाराजांनी केली मुलाला बेदम मारहाण; मुलाची प्रकृती नाजूक
मोठी बातमी, पुणे

#Alandi : हरिपाठ न आल्याने महाराजांनी केली मुलाला बेदम मारहाण; मुलाची प्रकृती नाजूक

पुणे : आळंदीमध्ये हरिपाठ न आल्याने मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. मुलाची प्रकृती नाजूक असून तो मागील आठ दिवसांपासून कोमात आहे. सध्या त्याच्यावर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ओम राजू चौधरी असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे. तर भगवान महाराज पोव्हणे असे मारहाण करणाऱ्या आरोपी महाराजांचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मुलाची आई कविता राजू चौधरी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार महाराजांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान महाराज पोव्हणे याचे आळंदीत श्री माऊली ज्ञानराज कृपा प्रसाद अध्यात्मिक शिक्षण संस्था आहे. त्यात अनेक मूल अध्यात्मिक शिक्षण घेतात. गेल्या एक वर्षांपासून जखमी ओम देखील त्या ठिकाणी अध्यात्मिक धडे गिरवत आहे. १० ...
पुणे, क्रीडा

‘ज्युनिअर मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत’ शुभम वाईकरला गोल्ड मेडल

लोकमराठी न्यूज नेटवर्क औंध (प्रतिनिधी) : आय.बी.बी.एस.एस. असोसिएशनच्या वतीने ओडिसा येथील बालेश्वर येथे आयोजित केलेल्या 'ज्युनिअर मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये' औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शुभम वाईकर या विद्यार्थ्याने ७० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवित, 'ज्युनिअर मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत' गोल्ड मेडल पदक मिळविले. ही स्पर्धा ८ व ९ फेब्रुवारी रोजी पार पडली. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी त्यांचे अभिनंदन करून, त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह क्रीडा विभागप्रमुख प्रा. बी.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग असून, सर...