विशेष सहयोग शिबिरांतर्गत दिव्यांग मुलांसाठी विविध सुविधा एकाच छताखाली
उन्नती सोशल फाउंडेशन व सप्तर्षी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन
पिंपरी : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उन्नती सोशल फाउंडेशन व सप्तर्षी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलांसाठी विशेष सहयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत अनेक सवलती आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले होते.
पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात रविवारी (दि. १२ डिसेंबर) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबीर संपन्न झाले. या शिबिरात वय वर्ष ६ ते १८ वयोगटातील शेकडो दिव्यांग मुलांनी सहभागी होत या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, सप्तर्षी फाउंडेशनचे सहसचिव मनोजकुमार बोरसे, ऋषाली बोरसे, विशाल पवार, विशाल घंदुरे, नंदकिशोर आहेर, समीना काझी, मच्छिन्द्र वीर, किरण जाधव, आ...