माणुसकी अजून जिवंत आहे
माणुसकी अजून जिवंत आहे हल्ली सहजच चालता बोलता, कार्यालयात, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, इतरत्र एक वाक्य कायम ऐकावयास मिळते, ,"हल्ली नाती आता व्यवहारी झाली आहेत ", म्हणजे कोणतेतरी हितसंबंध असल्याशिवाय एकमेकांशी नाते ठेवायचे नाही .या सर्व नात्यांना एक प्रकारे आर्थिक किंवा राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. पण याच्या विरुद्ध अनुभव देखील येत असतात.
असाच एक अनुभव सध्याच्या पावसाने व वादळाने उध्वस्त केलेल्या कोकणातील एका भागात आला. यावर्षी पाऊस वादळ याने कोकणात थैमान घातले आहे .यात भरीस भर दरडी कोसळणे ,डोंगर खचणे ,जमीन खचणे यामुळे गाव वाड्या उध्वस्त झाल्या. जनता इतरत्र मिळेल त्या ठिकाणी आश्रय शोधू लागले जनावरे जीवित हानी देखील झाले यांना मदतीचा हात देण्यासाठी पुण्यातील एका समूहाने कंबर कसली कोकणातील दुर्गम भागातील बिरवाडी,कुंभार वाडा,खरवली,किंजळघर,दादली,चोचिंदे या वाड्या-वस्त्या पर्यंतच्या...