विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून चंद्रकांत तापकीर यांचा वाढदिवस साजरा
तब्बल २०१ रक्तदात्यांनी केले विक्रमी रक्तदान अनेकांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ
काळेवाडी : सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त साई मल्हार सोशल फाउंडेशन, व्यंकटेश्वरा मित्र मंडळ, ओम साई ग्रुप, जाधव हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर, व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवारी (दि. ४ सप्टेंबर) साई मल्हार मेडिकल शेजारी करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन तसेच लहान मुलांचे डॉक्टर महाले यांच्या क्लिनिकचे उद्घाटन मा. विरोधी पक्षनेते व विदयमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. महाले, राजाराम तापकीर, मल्हारीशेठ तापकीर, स्विकृत सदस्य विनोद तापकीर, हरेश तापकीर, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्या अश्विनी चंद्रकांत तापकीर, 'ग' प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, स्विकृत सदस्य गोपाळ माळेकर...