
पिंपरी : रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात चिंचवडमधील गरवारे कंपनीजवळ घडला. नयन संजयकुमार इंगळे (वय २३, रा. ऋतुजा हाउसिंग सोसायटी, महात्मा फुलेनगर, चिंचवड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
इंगळे हे दुचाकीवरून जात असताना गरवारे कंपनीजवळील चौकातील रस्ता दुभाजकाला आणि खांबाला दुचाकी बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने नयन यांचा मृत्यू झाला.