डॉ. अमरसिंह निकम यांना डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार

डॉ. अमरसिंह निकम यांना डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार
माईसन, जर्मनी : डॉ. अँड्रियास एच. जंग यांच्या हस्ते डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार स्विकारला डॉ. डॉ. अमरसिंह निकम.

पिंपरी : पिंपरीगाव येथील डॉ. अमरसिंह निकम यांना आय. एच. झेड. टी. या संस्थेच्या वतीने डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या २६८ व्या जन्मदिनानिमित्त जर्मनीतील त्यांच्या मूळ जन्मस्थळी माईसन येथे नुकताच हा सोहळा पार पडला.

त्यावेळी सुधा अमरसिंह निकम आणि युरोप मधील बहुसंख्य होमिओपॅथिक तज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. मनिष निकम, डॉ. मनस्वी म. निकम आणि डॉ. सतीश म्हस्के यांनी होमिओपॅथीच्या शोधनिबंधावर आपले व्याख्यान दिले.

डॉ. अमरसिंह निकम हे गेली चाळीस वर्ष होमिओपॅथीद्वारे रुग्ण सेवा देत आहेत. होमिओपॅथीमध्ये संशोधन करून होमिओपॅथीमधील पहिले खाजगी १०० बेडचे हॉस्पिटल, आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल या नावाने चालवत आहेत. हजारो हृदय, किडनी, लिव्हर फेल्युअर यांसारख्या असाध्य रोगांना बरे करत जागतिक पातळीवर होमिओपॅथीला उत्तम आणि उच्च दर्जा देऊन तळागाळापर्यंत त्यांनी पोहोचवले.

मिशन होमिओपॅथी संघटना स्थापन करून शंभर डॉक्टरांची टीम तयार केली, जी जगभर मोठमोठ्या शहरात, खेड्यापाड्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने होमिओपॅथीचा प्रसार करण्याचे योगदान निरंतर करत आहे. त्याचबरोबर कोविड सारख्या महामारीत दिवस-रात्र निर्भीडपणे कोविड महामारी थोपवण्याचे काम केले.

Actions

Selected media actions