
हडपसर | प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील लक्ष्मीबाई भावराव पाटील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन (CIII) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील संशोधनाच्या संधी या विषयावरील कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विवेक पवार (सीईओ, पुणे) उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसायाकडे वळावे. डॉ. अशोक नगरकर(डी.आर.डी.ओ. एच.ई.एम.आर.एल. पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ) उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, पेटंट रजिस्टर करताना तत्काळ रजिस्टर केली पाहिजे. घेतली पाहिजे. फाईल कशी करायची यासंदर्भात माहिती दिली. तसेच कॉपीराईट संदर्भात माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख (IAS Retd.) उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अंगी गुणवत्ता तयार केली पाहिजे. तसेच आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्यामुळे विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण गोष्टी करायला पाहिजेत. असे मत रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी व्यक्त केले.

सचिन नायक यांनी लक्ष्मीबाई भावराव पाटील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन (CIII) च्या सुविधा आणि स्टार्टअप इकोसिस्टम याविषयी मार्गदर्शन केले. आशिष कळस (लक्ष्मीबाई भावराव पाटील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन (CIII) च्या सुविधा याविषयी मार्गदर्शन केले. कुंदन श्रीकांत (सीईओ. CIII वाय. सी. कॉलेज, सातारा यांनी कृत्रिम बुध्दीमत्ता व युवक-युवती उन्नयनीकरण या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सदानंद भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.नानासाहेब गायकवाड, प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, प्राचार्य डॉ.माधव सरोदे, प्राचार्य डॉ.बडदे, प्राचार्य डॉ.पांडुरंग भोसले, प्राचार्य डॉ. जरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांच्या परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.नयन पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार सचिन नायक यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.संजय अहिवळे, प्रा.ऋषिकेश खोडदे, प्रो.डॉ.दिनकर मुरकुटे यांनी डॉ.निशा गोसावी यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.