Mamurdi : मामुर्डीत सोसायटी पार्किंगमध्ये गांजा जप्त

Mamurdi : मामुर्डीत सोसायटी पार्किंगमध्ये गांजा जप्त

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (PCPC) खंडणी विरोधी पथकाने मामुर्डी येथील कुणाल आयकॉनिया सोसायटीच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी (दि. २) सायंकाळी ४.५० वाजता छापा टाकून सुमारे २१.३३ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंमकार हरी इंगवले (वय २५, रा. कृष्णानगर चिखली) आणि आयुष राजेंद्र भट (वय २५, रा. शिवतेजनगर, चिखली) अशी अटक केलल्या आरोपींची नावे आहेत.

सोसायटीच्या एफ/८०१ इमारतीच्या पार्किंगमध्ये आरोपी गांजा विक्रीसाठी ठेवून होते. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस हवालदार प्रदिप गोंडाबे यांना याबाबत माहिती मिळताच पथकाने छापा टाकून दोघांना रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून २१.३३ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला असून, हा गांजा फरार आरोपी किशोर (रा. मुंबई) याच्याकडून विकत घेऊन बेकायदेशीर विक्रीसाठी ठेवला होता, असे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.