बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर) : राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रदेशाध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते शहर राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या समन्वयकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. अर्बन सेलचे शहराध्यक्ष दत्तात्रय जगताप, महिला अध्यक्ष मनीषा गटकळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये २५ महिला व २५ पुरुष असे ५० पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
प्रत्येक समन्वयकांना पक्षाची जबाबदारी देताना प्रत्येकाला आपल्या आपल्या कार्याची जाणीव करून खासदार वंदना यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व नवनियुक्त समन्वयकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांनीही नवनियुक्त समन्वयकांना शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी युवक अध्यक्ष इम्रान शेख, पक्षाचे प्रवक्ते फजल शेख, विजय लोखंडे, दत्तात्रय जगताप, मनीषा गटकळ, माधव पाटील यांच्यासह पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते अभिजीत आल्हाट यांनी केले.