पिंपरी, दि. १३ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. शिवरायांच्या संदर्भात असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे.
दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ ते १९ फेब्रुवारी २०२३ या कालावधी मध्ये ही प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न होणार आहे. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या शिवप्रेमींना ऑनलाइन प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे आपले जीवनमान उंचावले आहे. त्यातील एक भाग म्हणजे सोशल मिडीयाचा समाजावर निर्माण झालेला प्रभाव, याचा प्रकर्षाने विचार करावा लागेल. तरूणाई सोशल मिडीयाच्या आभासी जगात भरकटून जाताना दिसत आहे. या तरूणाईला शिवरायांच्या तळपत्या इतिहासाची उजळणी व्हावी. या अनुषंगाने या प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सर्व शिवप्रेमींनी सहभाग घ्यावा. असे आवाहन चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे.
- असा घ्या स्पर्धेत सहभाग
ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात असून एका प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇