हडपसर, दि. ५ (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील प्लेसमेंट सेल, माजी विद्यार्थी समिती व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लेसमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयात SBI, Airtel, Kotak Mahindra, ICICI, HDFC & Altruist इतर कंपन्या आल्या होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांना जॉबची ऑफर दिली. तसेच ज्या विद्यार्थ्यांची जॉबसाठी निवड होईल त्या विद्यार्थ्यांना 18 ते 20 हजार रुपयांपर्यंत पगार देण्याची ऑफर दिली आहे.
कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब म्हणाले की, महाविद्यालयातून डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला एका हातात डिग्री सर्टिफिकेट मिळावे व दुसऱ्या हातात जॉबचे अपॉइंटमेंट लेटर मिळावे. अशा हेतूने महाविद्यालयात प्लेसमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे.
तसेच मॅजिक बस इंडिया फाउंडेशन या एनजीओ मार्फत विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थी निसंकोचपणे मुलाखतीला सामोरे जातील. व त्यामधून अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होईल. असे मत प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या प्रोग्राम मॅनेजर श्रद्धा पोटे म्हणाल्या की, आमची एनजीओ तरुण मुलांना जॉब उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करीत आहे. आजपर्यंत अनेक तरुण मुला-मुलींना जॉबची संधी उपलब्ध करून दिली आहे. यापुढे एस. एम. जोशी कॉलेजमधून डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जॉबची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मॅजिक बस इंडिया फाउंडेशन कार्य करेल. असे मत प्रोग्राम मॅनेजर श्रद्धा पोटे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे प्रवीण खिलारे, अवधूत राऊत, निखिल पवार, अखिब अंतुले उपस्थित होते. एसबीआय बँकेचे हरिओम गुप्ता, एअरटेल कंपनीचे विजय यादव तसेच महाविद्यालयातील प्लेसमेंट विभागाच्या चेअरमन डॉ. हेमलता कारकर, माजी विद्यार्थी समितीचे चेअरमन डॉ.अतुल चौरे, डॉ. सुनील खुंटे, डॉ. मल्हारी रास्ते प्रा. स्वप्नील ढोरे, प्रा. प्रदीप जाधव, प्रा. संगीता यादव, डॉ.दिनकर मुरकुटे, डॉ. विश्वास देशमुख, डॉ.अशोक पांढरबळे, प्रा. सचिन शिंदे व बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.