
पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने एका तरुणाकडून पिस्तुल जप्त केले. ही कारवाई वाकड येथे करण्यात आली. साद यासीन सय्यद (वय १९, रा आदर्श कॉलनी, वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. वाकड येथील लक्ष्मीबाई बारणे गार्डनच्या भिंतीलगत एक तरुण पिस्तुल घेऊन आल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून साद सय्यद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे एक पिस्तुल जप्त केले.