
पिंपरी : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने एका दारू भट्टीवर छापा टाकून एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मावळ तालुक्यातील पुसाणे येथे करण्यात आली. आरोपी महिलेने पुसाणे गावात ओढ्यावरील बंधाऱ्याजवळ दारू तयार करण्यासाठी गूळ मिश्रित रसायन भिजत घातले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या दारूभट्टीवर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला पसार झाली. दरम्यान, पोलिसांनी ३८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.