PIMPRI : गॅस रिफिलिंग प्रकरणी तरुणाला अटक

PIMPRI : गॅस रिफिलिंग प्रकरणी तरुणाला अटक


पिंपरी : घरगुती वापराच्या सिलिंडरमधून बेकायदा गॅस काढून छोट्या सिलिंडरमध्ये भरला आणि त्याची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई रावेत येथे करण्यात आली. सचिन नरसिंग बिरादार (वय २३, रा. एस. बी. पाटील, रोड, रावेत) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी बिरादार याचे रावेत येथे मृणाल गॅस रिपेअरिंग सेंटर नावाचे दुकान आहे. त्याने दुकानात घरगुती वापराच्या सिलिंडरमधून चार किलो वजनाच्या छोट्या सिलिंडरमध्ये चोरून बेकायदेशीरपणे धोकादायकरीत्या गॅस काढला. या छोट्या सिलिंडरची त्याने काळ्या बाजारात विक्री केली. खंडणी विरोधी पथकाने दुकानावर कारवाई करून १९ हजार दोनशे रुपये किंमतीचा गॅस साठा आणि इतर साहित्य जप्त केले.