PIMPRI: दोन महिलांना मारहाण; तरुणाला अटक

PIMPRI: दोन महिलांना मारहाण; तरुणाला अटक


पिंपरी : एका तरुणाने घरात शिरून दोन महिलांना मारहाण केली. ही घटना चिंचवड येथील दळवीनगर येथे घडली. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. गौरव भारत कुदळ (वय २१, रा. दळवीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी गौरव यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून गौरव फिर्यादी यांच्या घरात आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ केली. फिर्यादीने गौरव याला जाब विचारला असता त्याने फिर्यादीला सळईने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची बहीण आली असता त्यांनाही आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.